झी टीव्ही वाहिनीवरील ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ हा शो लोकप्रिय आहे. आपल्या सुमधूर आवाजात गाणी गात छोटे गायक प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. छोट्या पडद्यावरील या रिएलिटी शोच्या येणाऱ्या भागात बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक राकेश रोशन दिसणार आहेत. या भागाचा प्रोमो व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ शोचे सूत्रसंचालन भारती सिंग करत आहे. या कार्यक्रमात हजेरी लावून राकेश रोशन यांनी छोट्या उस्तादांचा उत्साह वाढवला. सारेगमपच्या मंचावर राकेश रोशन यांनी भारती सिंहसह रोमॅण्टिक गाण्यावर डान्सही केला. त्यांच्या डान्सचा हा व्हिडीओ हृतिक रोशनने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केला आहे.

हेही वाचा >> ‘गलवान’चा उल्लेख करत रिचा चड्ढाने केलं ट्वीट, नेटकऱ्यांची fukrey3 बॉयकॉट करण्याची मागणी

हेही वाचा>> दुसऱ्यांदा आई झालेल्या देबिना बॅनर्जीने शेअर केला लेकीचा पहिला फोटो, म्हणाली…

“माझे आजोबा रोशन लाल नागराथ यांच्या काळापासून गाणं व संगीत हा नेहमीच रोशन कुटुंबियांचा अत्यंत महत्त्वाचा भाग राहिला आहे. माझे वडील राकेश रोशन व काका राजेश रोशन पहिल्यांदाच छोट्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’चा हा भाग बघण्यासाठी मी उत्सुक आहे”, असं कॅप्शन हृतिकने या पोस्टला दिलं आहे.

हेही वाचा>> “तैमूरला जंक फूड…” सैफ अली खानने लेकाच्या खाण्याच्या सवयींबाबत केला खुलासा

हृतिक रोशनने शेअर केलेल्या व्हिडीओवर चाहत्यांनी लाइक्सचा वर्षाव केला आहे. राकेश रोशनसह राजेश रोशनही झी टीव्ही वाहिनीवरील ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ शोमध्ये सहभागी होणार आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rakesh roshan romantic dance with bharti singh on saregamapa little champs set hrithik roshan shared video kak
First published on: 24-11-2022 at 16:07 IST