scorecardresearch

“माझी आई तुझ्यामुळे गेली” राखी सावंतचे पती आदिल खानवर गंभीर आरोप, म्हणाली “त्याने आईच्या उपचारासाठी…”

राखी सावंतचे पती आदिल खानवर गंभीर आरोप

rakhi sawant alleged adil khan (2)
राखी सावंतचे आदिल खानवर गंभीर आरोप. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

बॉलिवूड अभिनेत्री व मॉडेल राखी सावंत तिच्या लग्नामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. राखीच्या आईचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. त्यानंतर राखीने तिच्या संसारात वादळ आल्याचं म्हटलं होतं. पती आदिल खानचं दुसऱ्या मुलीबरोबर अफेअर असल्याचा खुलासा राखीने मीडियासमोर केला होता.

आईच्या निधनानंतर राखीने दोन दिवसांनी आदिल खानवर फसवत असल्याचे आरोप केले होते. आता आदिलने राखीचं घर सोडलं आहे. आदिल त्याच्या गर्लफ्रेंडबरोबर राहत असल्याचं राखीने सांगितलं आहे. राखीने कॅमेऱ्यासमोर आदिलच्या गर्लफ्रेंडचं नावही जाहीर केलं आहे. ‘तनु’ असं आदिलच्या गर्लफ्रेंडचं नाव असल्याचं राखी म्हणाली आहे.

हेही वाचा>> ७५ महिलांना अंगद बेदीने केलंय डेट; नोरा फतेहीबरोबर होतं अफेअर, पण नेहा धुपिया गरोदर राहिली अन्…

हेही वाचा>> भारताच्या नकाशावर पाय दिल्याने अक्षय कुमार ट्रोल; संताप व्यक्त करत नेटकरी म्हणाले…

राखीने याबरोबरच आदिलवर पुन्हा गंभीर आरोप केले आहेत. राखीचा नवीन व्हिडीओ समोर आला आहे. आदिलमुळे आईचं निधन झाल्याचं राखी म्हणाली आहे. “माझी आई आदिल खानमुळे गेली. आदिलने तिच्या उपचारासाठी पैसे दिले नाहीत. तिच्यावर वेळीच उपचार झाले असते, तर माझी आई कदाचित आज जिवंत असती”, असं राखी म्हणाली आहे.

हेही वाचा>> बीएमडब्ल्यू गाडी, घरासाठी पैसे अन्…; सुकेश चंद्रशेखरकडून नोरा फतेहीने घेतलेले महागडे गिफ्ट

आदिल व राखीने मे २०२२ मध्ये कोर्ट मॅरेज केलं होतं. त्यानंतर जूनमध्ये त्यांनी निकाहही केला होता. ‘बिग बॉस’मधून बाहेर येताच राखीने याचा खुलासा केला होता. तेव्हाही आदिलने राखीबरोबरचं लग्न मान्य करण्यास नकार दिला होता. त्यानंतर थोड्या दिवसांनी आदिलने राखीबरोबर लग्न केल्याचं मान्य केलं होतं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-02-2023 at 18:09 IST