Sanket Pathak On Rakhi Sawant: राखी सावंत आजपर्यंत अनेकदा बिग बॉस या शोमध्ये सहभागी झाली आहे. बिग बॉसच्या पहिल्या सीझनमध्ये राखी सावंत सहभागी झाली होती. तसेच, राखी सावंत बिग बॉसच्या १४ व्या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. १४ व्या सीझनमध्ये ती फायनलिस्ट ठरली होती.

राखी सावंत फक्त बिग बॉस हिंदीमध्येच सहभागी झाली नव्हती. तर, ती बिग बॉस मराठीमध्येदेखील सहभागी झाली होती. बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनमध्ये तिने लक्ष वेधून घेतले होते. तर, सध्या ती बिग बॉसच्या सहाव्या सीझनमध्येदेखील स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे.

राखी सावंत बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनमध्ये वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे. जेव्हा पासून ती बिग बॉसच्या घरात आली तेव्हा पासून ती सतत काहीतरी करताना दिसते. राकेश बापटबरोबरच्या तिच्या मैत्रीची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. तसेच, सतत कोणत्या ना कोणत्या स्पर्धकाबरोबर तिचे भांडण होत असल्याचे पाहायला मिळते. इतकेच नाही तर, राखी सावंत विचित्र मेकअप करत घरातील सदस्यांना घाबरवत असल्याचेदेखील पाहायला मिळते.

Award Banner

काहीच दिवसांपूर्वी संकेत पाठक बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला. त्यानंतर विविध मुलाखतींमध्ये घरातील इतर स्पर्धकांबद्दल त्याचे मत व्यक्त केले. एका मुलाखतीत राकेश काहीच करत नाही, त्याने खेळावे असे म्हटले. आता राखीबद्दलचे त्याचे वक्तव्यदेखील चर्चेत आहे.

“त्रास देण्यासाठी…”

संकेत पाठकने ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत राखी सावंतबद्दल तो म्हणाला, “राखीने घरात नाकात दम करून ठेवला होता. ती कुठलाही मुद्दा कधीही काढायची. रात्री किती वाजले हे तर आम्हाला कळायचे नाही. तर ती मध्यरात्री उठूनदेखील काही मुद्दे काढायची. सगळ्यांना उठवायची. तिचं त्सुनामीसारखं असायचं. तो त्सुनामी कधीही यायचा. कधी त्याला कारणं असायची, कधी कारणं नसायची. मी तिला असंही म्हणालो होतो की मला तुझं संपूर्ण वागणं खोटं वाटतं. मी तिला म्हणालेलो की तू एक नंबरची खोटारडी आहेस. तू सगळं मुद्दाम करतेस, त्रास देण्यासाठी करतेस. फक्त तू कशी दिसशील याच्यासाठी करतेस.”

“राखीचा भाऊ तिच्यासारखाच…”

पुढे तो म्हणाला, “जेव्हा बिग बॉसच्या घरात स्पर्धकांची कुटुंबे आली होती. राखीचा भाऊ तिच्यासारखाच होता. तेव्हा मला समजलं की जसे राखीचे व्यक्तीमत्व आहे, तसे एखाद्याचे व्यक्तीमत्व असू शकतं. जे मला खोटं वाटत होतं. म्हणजे ती खरं रडते की खोटं रडते हे कळत नाही. पण, तिचे व्यक्तीमत्वच तसे आहे. ती गोड बोलते, पाठीमागे बोलते, मुद्दाम बोलते काहीच कळत नाही.ती गूढ आहे.ती फक्त स्वत:साठी जगते, स्वत:साठी खेळते आणि जे काही करते, ते स्वत:साठी करते. पण, ती जशी आहे, तशीच आहे. हे मला आत गेल्यावर कळलं. मी तिला हेही सांगितलं की तू खरंच अशी आहेस.”