scorecardresearch

Premium

‘बिग बॉस’मधून राखी सावंतचा पत्ता होणार कट? घरातली भांडी फोडल्याने अभिनेत्रीबाबत घेण्यात आला ‘हा’ मोठा निर्णय

आता ही भांडी फोडणं तिला चांगलंच महागात पडलं आहे.

rakhi bigg boss

‘बिग बॉस मराठी’च्या चौथं पर्व सध्या रंजक वळणावर आहे. घरातील सदस्यांमध्ये होणारे वाद, मतभेद सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. या वाद मतभेदांमध्ये चर्चेचा विषय ठरते ती राखी सावंत. काही दिवसांपूर्वीच राखी चे बिग बॉसच्या घरात एन्ट्री झाली आणि तिने आता या घरात धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे.

नुकतच राखी सावंत आणि अपूर्वा नेमळेकर यांचे जोरदार भांडण झालं. या भांडणात राखी इतकी संतापली की तिने घरातली भांडी फोडली. फक्त एक कॉफी न मिळाल्याने तिला तिचा राग अनावर झाला. पण आता ही भांडी फोडणं तिला चांगलंच महागात पडलं आहे.

kangana-abu-salem
कंगना रणौत कुख्यात गँगस्टर अबू सालेमसह? व्हायरल होणाऱ्या ‘त्या’ फोटोवर अभिनेत्रीची प्रतिक्रिया चर्चेत
Sukanya troll
“तिने जास्त दारू प्यायली आहे…,” डान्समुळे ट्रोल करणाऱ्याला सुकन्या मोनेंनी दिलं सडेतोड उत्तर, म्हणाल्या…
vikrant-massey-and-his-wife-sheetal-thakur
“आम्ही पालक बनणार”; मिर्झापूर फेम विक्रांत मेस्सीने दिली गोड बातमी; अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
amala akkineni
नागार्जुन यांच्या दुसऱ्या पत्नीने केलंय अनेक सुपरहिट चित्रपटांत काम, कोलकात्यात जन्मलेल्या अमाला कशा झाल्या तेलुगू कुटुंबाच्या सून? वाचा

आणखी वाचा : आलिया भट्ट पाठोपाठ श्रिया पिळगावकर दिसणार देहविक्री करणाऱ्या महिलेच्या भूमिकेत; म्हणाली, “यासाठी मी…”

घरातील सदस्यांनी तिची कॉफी लपवल्याचा तिला संशय होता. “मला माझी कॉफी द्या” असं म्हणत तिने अपूर्वा नेमळेकरशी कडाक्याचं भांडण केलं. इतकच नाही तर त्यांच्यात हाणामारी सुरू झाली. इतकच नाही तर राखी अक्षय केळकरच्या अंगावरही धावून गेली. संतापाच्या भरात तिने स्वयंपाक घरातली भांडी फोडली. राखीचा हे वागणं पाहून घरातली इतर सर्वच सदस्य तिच्या विरोधात गेले आणि त्यांनी तिच्या या वागण्याचा निषेध नोंदवला.

हेही वाचा : Video: राखी सावंत बॉयफ्रेंड आदिल खानबरोबर सुरू करणार नवीन प्रवास; म्हणाली, “आता आम्ही दोघं…”

राखीचा वागणं पाहून घरातील इतर सदस्यांनी राखीवर नोंदवलेल्या निषेधाची ‘बिग बॉस’ने दखल घेतली आणि “राखी शिक्षेस पात्र आहे” असं म्हणत तिला पुढील आठवड्याच्या घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी थेट नॉमिनेट करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता राखी डेंजर झोनमध्ये गेली आहे. सगळेच इतर स्पर्धक तिच्या विरोधात असल्याने ती पुढील आठवड्यात घराबाहेर जाणार का हे येत्या काही दिवसातच समोर येईल.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rakhi sawant broke property of big boss house rnv

First published on: 15-12-2022 at 10:52 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×