Rakhi Sawant Reaction on Raqesh Bapat Tanvi Kolte Dance Promo: बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वात आजच्या एपिसोडमध्ये मोठा ड्रामा पाहायला मिळणार आहे. हा ड्रामा अर्थातच वाईल्ड कार्ड एंट्री घेणारी ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंत करणार आहे. बिग बॉस मराठीचा नवा प्रोमो समोर आला आहे. हा प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.

कलर्स मराठीने बिग बॉस मराठीच्या आजच्या एपिसोडचा प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये दिसतं की राकेश बापट व तन्वी कोलते रोमँटिक डान्स करतात. डान्सदरम्यान, राकेश तन्वीला गालावर किस करतो. त्यानंतर राखी तन्वीला विचारते, ‘हा कुठला डान्स आहे?’ त्यावर तन्वी ‘त्याला (राकेशला) विचार ना,’ असं म्हणते. तन्वी व राकेश डान्स करताना राखी डोळे बंद करते. इतकंच नाही तर डान्स संपल्यानंतर राकेश राखीसमोर तन्वीला पुन्हा किस करतो. राकेश हसत असतो. त्यानंतर राखी चिडते आणि आता तू परिणाम बघ असं म्हणते. त्यानंतर ती धक्कादायक गोष्ट करते.

राखी सावंत हातात कात्री घेते आणि रागात स्वतःचे केस कापते. मन दुखावलेली राखी आरशासमोर उभी राहून केस कापत असते. तन्वी, राकेश, अनुश्री सगळेच तिथे येतात. ‘राखी’ तू हे काय करतेय, असं राकेश तिला विचारतो. त्यावर राखी म्हणते, “राकेश, मी स्वतःला शिक्षा देतेय, मला कोणीच हर्ट करू शकत नाही, फक्त मीच मला हर्ट करू शकते,’ असं म्हणत राखी रडू लागते. तन्वी व दिपाली तिला सांभाळताना दिसतात. तर दुसरीकडे राकेश बापटला राखीच्या या कृतीचा मोठा धक्का बसतो. तो अवाक् होऊन तिच्याकडे पाहत उभा असतो.

पाहा बिग बॉसचा प्रोमो

दरम्यान, हा प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही जण या व्हिडीओवर हसणारे इमोजी कमेंट करत आहेत. तर काहींनी ‘राकेश आता गेला तू’, ‘राखीमुळे बिग बॉस बघायला मज्जा येते,’ ‘अरे तन्वी त्याची बहीण आहे,’ ‘राखी तो फक्त डान्स होता, राकेशला जगू दे,’ ‘हिचं नेहमीचंच असतं.. ही अभिनवच्या पण प्रेमात होती,’ ‘बिग बॉसच्या घरातील इम्रान हाश्मी – राकेश’, ‘शोने पातळी सोडली’, ‘राखीने टक्कल केलं असतं तर खूप चांगलं झालं असतं..नकली केस कापून काही उपयोग नाही,’ ‘तन्वीच्या घरचे हे सगळं बघून जीव देतील,’ ‘फक्त मनोरंजनासाठी राखी असं करू शकत नाही,’ ‘आता वाटतंय बिग बॉस बंद व्हावं,’ ‘राखी आता अती करतेय,’ ‘तन्वी राकेशची बहीण आहे हे लक्षात ठेवा सर्वांनी,’ ‘बहीण भाऊ म्हणत म्हणत असे वागतात.. बिग बॉससाठी काय काय करतील,’ ‘राखी खरे केस कापले असते का?’ अशा कमेंट्स या व्हिडीओवर पाहायला मिळत आहेत.

Rakhi Sawant cutting her own hair in Bigg Boss Marathi 6
व्हिडीओवरील कमेंट्स (फोटो- स्क्रीनशॉट)

राखी सावंतच्या ड्रामामुळे घरात काय घडणार, ते आजच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळेल.