rakhi sawant gets emotional in bigg boss marathi house remembered her father | Loksatta

“माझ्या कॅन्सरग्रस्त आईसाठी…” बिग बॉसच्या घरात राखी सावंत भावूक

Bigg Boss Marathi: वडिलांच्या आठवणीने राखी सावंत बिग बॉसच्या घरात भावूक

“माझ्या कॅन्सरग्रस्त आईसाठी…” बिग बॉसच्या घरात राखी सावंत भावूक
राखी सावंतने बिग बॉसच्या मराठीच्या घरात प्रवेश केला आहे. (फोटो: कलर्स मराठी)

‘बिग बॉस मराठी’चं चौथं पर्व दिवसेंदिवस अधिकच रंजक होत चाललं आहे. वाइल्ड कार्डद्वारे ‘बिग बॉस’च्या घरात राखी सावंतने एन्ट्री घेतली आहे. ‘बिग बॉस’च्या घरात राखीला पाहून सदस्यांसह प्रेक्षकांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे.

राखीने ‘बिग बॉस’च्या घरात पाऊल ठेवताच अपूर्वा नेमळेकरला टार्गेट करायला सुरुवात केल्याचं पाहायला मिळत आहे. बिग बॉस हिंदी गाजवणारी राखी मराठीमध्ये कशी काय आली? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. खुद्द राखीनेच मराठी बिग बॉसमध्ये येण्यामागील कारण स्पष्ट केलं आहे. अपुर्वाने राखीला बिग बॉस मराठीच्या घरात येण्याचा निर्णय का घेतला? असा प्रश्न विचारला.

हेही वाचा>> “गेली अनेक वर्ष…” प्रथमेश परबच्या वाढदिवशी त्याच्या कथित गर्लफ्रेंडने केलेली पोस्ट चर्चेत

अपुर्वाच्या प्रश्नाला उत्तर देताना राखी म्हणाली, “सात-आठ वर्षांपूर्वी माझ्या वडिलांचं निधन झालं. त्यावेळी हिंदीसह इतर भाषांमध्ये बिग बॉस सुरू होतं. परंतु, मराठी बिग बॉस सुरू झालं नव्हतं. माझ्या वडिलांनी तेव्हा मला ‘मराठी बिग बॉस’ का नाही असा प्रश्न विचारला होता. जर भविष्यात बिग बॉस मराठी सुरू झालं आणि तुला त्यात जाण्याची संधी मिळाली, तर नक्की जा, असं ते मला म्हणाले होते. त्यानंतर माझे वडील हे जग सोडून गेले”.

हेही वाचा >> सुंबूल तौकीर ऑन स्क्रीन पती फहमान खानसह बांधणार लग्नगाठ? ‘बिग बॉस’मध्ये खुलासा करत म्हणाली…

हेही वाचा >> “मी शेवटपर्यंत पत्नीधर्म निभावला पण…” मानसी नाईकचा वैवाहिक आयुष्याबाबत मोठा खुलासा

‘बिग बॉस मराठी’च्या घरात वडिलांबद्दल बोलताना राखी भावूक झाली होती. ती पुढे म्हणाली, “माझी आई कॅन्सरग्रस्त आहे. मी बिग बॉस मराठीमध्ये सहभागी व्हावं ही तिचीदेखील इच्छा होती. आपल्या मराठी बिग बॉसमध्ये जा, असं माझी आईही मला म्हणाली. म्हणून मी मराठी बिग बॉसमध्ये येण्याचा निर्णय घेतला”.

राखीसह विशाल निकम, मीरा जगन्नाथ व आरोह वेलणकरनेही ‘बिग बॉस मराठी’च्या घरात वाइल्ड कार्डद्वारे प्रवेश घेतला. चार नवीन सदस्यांमुळे आता ‘बिग बॉस’च्या घरातील समीकरणं बदललेली पाहायला मिळणार आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-11-2022 at 14:19 IST
Next Story
‘पैठणी’ चित्रपटाचा ट्रेलर आता रुपेरी पडद्यावर; आनंद व्यक्त करत सायली संजीव म्हणाली…