Rakhi Sawant Talks About Priyanaka Chopra & Nick Jonas Age Gap : राखी सावंत सध्या ‘बिग बॉस मराठी’मुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच ती ‘बिग बॉस मराठी’ सीझन सहाच्या घरातून बाहेर पडली. शोमध्ये असताना राखी अनेकदा चर्चेत राहिली. राखी तिची मतं, प्रतिक्रिया ठामपणे मांडत असते. अशातच आता तिने प्रियांका चोप्राबद्दल वक्तव्य केलं आहे.
राखी तिच्या व्यावसायिक आयुष्यासह खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असते. ‘बिग बॉस मराठी’तसुद्धा राकेश बापटबरोबरच्या बाँडमुळे ती चर्चेत राहिली. राखी सावंत अनेकदा अनेक सेलिब्रिटींबद्दल, त्यांच्या खासगी आयुष्याबद्दलही बोलत असते. अशातच आता राखीने लोकप्रिय अभिनेत्री प्रियांका चोप्राबद्दल वक्तव्य केलं आहे. यावेळी ती अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याबद्दल बोलली आहे. राखी नेमकी काय म्हणाली याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…
राखी सावंत प्रियांका चोप्राबद्दल काय म्हणाली?
‘फिल्मी ग्यान’ला दिलेल्या मुलाखतीत राखीला तरुण मुलं, मॉडेल तुला विचारत असतील, तुझ्या मागे असतील ना, मग तू त्यांना नकार कसा देतेस? असं विचारल्यानंतर राखी म्हणाली, “१६ वर्षांची मुलं, १७-१८ वर्षांची मुलं पटवण्याचा प्रयत्न करतात. मला नाही आवडत. अर्ध्या वयाच्या मुलावर प्रेम करून लग्न करायला मी प्रियांका चोप्रा नाही. मला जमणार नाही. पण, तिने स्वत:ची इतकी काळजी घेतली आहे की निक जोनस तिच्यासमोर मोठा वाटतो. मला माझ्याच वयाची मुलं आवडतात. चार-पाच वर्षांचं अंतर चालेल.”
राखीने यावेळी तिला मुलांमध्ये कोणते गुण आवडतात याबद्दलही सांगितलं आहे. तसेच बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्यांबद्दलही तिने यावेळी प्रतिक्रिया दिली आहे. अजय देवगण, नाना पाटेकर, शाहरुख खान या मंडळींबद्दल तिने एका शब्दात प्रतिक्रिया देत कौतुक केलं आहे.
राखी सावंतने आतापर्यंत हिंदी आणि मराठी ‘बिग बॉस’मध्ये अनेकदा सहभाग घेतला आहे. ती अनेकदा या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेत चर्चेत राहते. घरातील स्पर्धकांबरोबर तिचे अनेकदा वाद होतात. ‘बिग बॉस मराठी’च्या या पर्वातसुद्धा अनेकदा ती तिच्या विधानांमुळे चर्चेत राहिली. परंतु, यावेळी तिच्यामुळे शो अधिक रंजक झाला असंही म्हटलं गेलं.
दरम्यान, राखी सावंतने या मुलाखतीत ‘बिग बॉस मराठी’ आणि हिंदी दोन्ही शोचा टीआरपी जेव्हा खाली जाईल तेव्हा तेव्हा तिला बोलावलं जाणार असं म्हटलं आहे. हिंदीसह मराठी ‘बिग बॉस’चही तिने कौतुक केलं आहे.
