scorecardresearch

Premium

Video: जेसीबीनं सासरी पोहोचली राखी सावंत; व्हिडीओ पाहून नेटकरी वैतागले, म्हणाले, “कोणीतरी जाऊन तो जेसीबी उलटा करा”

ड्रामा क्वीन राखी सावंतचा ‘हा’ नवा व्हायरल व्हिडीओ पाहा

Rakhi Sawant
ड्रामा क्वीन राखी सावंतचा 'हा' नवा व्हायरल व्हिडीओ पाहा

बॉलीवूडची ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणारी राखी सावंत नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सध्या ती तिच्या खासगी आयुष्यातल्या प्रकरणामुळे अधिक चर्चेत आली आहे. पण अशातच तिनं काल स्वतःच्या बायोपिकची घोषणा केली. तसेच या बायोपिकसाठी अभिनेत्री आलिया भट्ट आणि विद्या बालनला विचारलं असल्याचं तिनं सांगितलं. आता राखीचा जेसीबीवरून सासरी जाताना व्हिडीओ व्हायरल झाला असून हा व्हिडीओ पाहून नेटकरी मात्र वैतागले आहेत.

हेही वाचा – ‘जवान’नंतर आता ‘टायगर ३’चा जलवा; ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार दमदार टीझर?

shivani rangole
निरागस चेहरा, परकर-पोलकं अन्…; शिवानी रांगोळे बालपणी कशी दिसायची? व्हिडीओ व्हायरल
avadhoot gupte
Video : अवधूत गुप्तेचे आणखी एक स्वप्न झालं पूर्ण, व्हिडीओ शेअर करत म्हणाला “दरवर्षी मनात यायचं की…”
riteish deshmukh shared romantic video with wife genelia deshmukh
‘तुझे मेरी कसम’ ते ‘वेड’, रितेश-जिनिलीयाचा रोमॅंटिक व्हिडीओ चर्चेत; नेटकरी म्हणाले, “दादा-वहिनी…”
mrunmayee deshpande gautami deshpande fight
Video : “तुला बघते थांब…”, मृण्मयी आणि गौतमी देशपांडेचं भर सेटवर भांडण, व्हिडीओ आला समोर

जेसीबीवरून प्रवास करतानाचा राखीचा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘विरल भयानी’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये जेसीबीमधून राखी सासरी जाताना पाहायला मिळत आहे. तसेच विक्टरी दाखवताना दिसत आहे.

हेही वाचा – “…तर गंभीर परिणाम भोगावे लागतील”; उत्कर्ष शिंदेच्या ‘त्या’ पोस्टनं वेधलं लक्ष, म्हणाला…

हेही वाचा – Video: गणपती बाप्पाला २१ मोदकांचा नैवेद्य का दाखवतात? लिटिल चॅम्प्सनं दिलेलं उत्तर ऐकून मृण्मयी देशपांडे झाली थक्क

राखीच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्यानं लिहीलं आहे की, “जेसीबीचं काम कचरा साफ करणं आहे आणि जेसीबी तेच काम करत आहे.” तर दुसऱ्या नेटकऱ्यानं लिहीलं आहे की, “जेसीबी हिला कुठेतरी घेऊन जा. खूप वैताग आला आहे. नौटंकी.” तसेच तिसऱ्या नेटकरीनं लिहीलं आहे की, “कृपया कोणीतरी जाऊन तो जेसीबी उलटा करा.”

हेही वाचा- Rahul Vaidya And Disha Parmar: लक्ष्मी आली घरी! राहुल वैद्यच्या आई-वडिलांनी नातीचं केलं असं स्वागत; पाहा व्हिडीओ

दरम्यान, २०२२मध्ये आदिल आणि राखीने कोर्ट मॅरेज केलं होतं. त्यानंतर जूनमध्ये त्यांनी निकाह सुद्धा केला. याचा खुलासा राखीनं ‘बिग बॉस’मधून बाहेर येताच केला होता. तेव्हा आदिलनं राखीबरोबरचं लग्न मान्य करण्यास नकार दिला होता. पण त्यानंतर थोड्या दिवसांनी आदिलनं राखीबरोबरचं लग्न मान्य केलं होतं. पण आता दोघांमध्ये सध्या आरोप-प्रत्यारोपचं सत्र सुरू आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rakhi sawant reaches husband adil durrani home on jcb video goes viral on social media pps

First published on: 25-09-2023 at 19:00 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×