शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शाहरुखचे चाहते खूप आतुरतेने या चित्रपटाची वाट बघत आहेत. तर नुकताच या चित्रपटाचा प्रिव्ह्यू व्हिडीओ प्रदर्शित झाला. यामध्ये शाहरुख खानबरोबरच या चित्रपटातील इतर स्टारकास्टचीही झलक दिसली. या व्हिडीओतील शाहरुख खानच्या लूकने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. या व्हिडीओमध्ये त्याने टक्कल केलं असल्याचंही दिसलं. आता त्यावर बॉलीवूडमधील एका आघाडीच्या अभिनेत्रीने प्रतिक्रिया दिली आहे.

काल शाहरुख खानच्या बहुप्रतीक्षित जवान चित्रपटाचा प्रीव्ह्यू व्हिडीओ समोर आला आणि सर्वांच्याच भुवया उंचावल्या. याचा मुख्य कारण या व्हिडीओमध्ये दिसणारी ॲक्शन नसून शाहरुख खानचा बदललेला लूक आहे. या चित्रपटामध्ये तो पहिल्यांदाच टक्कल केलेल्या लूकमध्ये दिसून आला. त्याच्या या लूकवर नेटकरी आणि त्याचे चाहते विविध प्रतिक्रिया देत आहेत. तर आता त्याच्या या लूकवर अभिनेत्री राखी सावंतनेही प्रतिक्रिया दिली आहे.

आणखी वाचा : Video: शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटात ‘ही’ प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री दिसणार महत्वपूर्ण भूमिकेत, पहिली झलक समोर

राखीचा एक व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे. यामध्ये ती मीडिया फोटोग्राफर श्री शाहरुख खानच्या जवान चित्रपटाच्या या व्हिडीओबद्दल बोलताना दिसत आहे. तिने अजून हा व्हिडीओ पाहिला नाही. परंतु शाहरुख खानने टक्कल केल्याचं कळतच तिला खूप आश्चर्य वाटलं. ती म्हणाली, “शाहरुख खानने टक्कल केलं! त्याचे केस कुठे अनेक!!” त्यावर एका फोटोग्राफरने तिला विचारलं की, “तू त्याला या नवीन लूकमध्ये पाहिलं नाहीस का?” त्यावर राखी म्हणाली, “माझे डोळे फुटले तरी मी त्याला टक्कल केलेलं का पाहू! शाहरुख खूप हँडसम आहे. शाहरुखने टक्कल केलं तर आता मी पण टक्कल करणार.”

हेही वाचा : Video: “हिला मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवा…”; राखी सावंतने केलेला लुंगी डान्स पाहून नेटकरी हैराण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राखी सावंत हा व्हिडीओ सध्या खूप चर्चेत आला आहे. या व्हिडीओवर कमेंट करत नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. तर या नवीन व्हिडीओमुळे राखी पुन्हा एकदा ट्रोल होऊ लागली आहे.