scorecardresearch

“माझ्या आईचं निधन झालं, तेव्हा आदिल गर्लफ्रेंडबरोबर…”, राखी सावंतचा खळबळजनक खुलासा

“आदिलच्या शरीरावर लव्ह बाईट्स…”, राखी सावंतचा खुलासा

rakhi sawant alleged adil khan (2)
राखी सावंतचा पतीवर धक्कादायक आरोप. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

मॉडेल व अभिनेत्री राखी सावंतच्या संसारात वादळ आलं आहे. त्यामुळे राखी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आदिलचं दुसऱ्या मुलीबरोबर अफेअर असल्याचा खुलासा राखी सावंतने केला आहे. राखीने मीडियासमोर येत त्याच्या गर्लफ्रेंडचं नावही जाहीर केलं. ‘तनु’ असं आदिल खानच्या गर्लफ्रेंडचं नाव असल्याचं राखी म्हणाली. राखीने आदिलवर गंभीर आरोप केले आहेत.

राखीच्या आईचं काही दिवसांपूर्वीच निधन झालं आहे. राखीने तिच्या आईच्या निधनासाठी आदिल खानला जबाबदार ठरवलं आहे. “माझी आई आदिल खानमुळे गेली. आदिलने तिच्या उपचारासाठी पैसे दिले नाहीत. तिच्यावर वेळीच उपचार झाले असते, तर माझी आई कदाचित आज जिवंत असती”, असं राखी म्हणाली आहे.

हेही वाचा>> ७५ महिलांना अंगद बेदीने केलंय डेट; नोरा फतेहीबरोबर होतं अफेअर, पण नेहा धुपिया गरोदर राहिली अन्…

राखीने आदिल खानबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. “आईचं निधन झालं तेव्हा आदिल त्याच्या गर्लफ्रेंडबरोबर होता”, असं राखी म्हणाली आहे. राखीचा नवीन व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये तिने आदिलवर शारीरिक हिंसाचाराचे आरोपही केले आहेत. “गर्लफ्रेंडच्या सांगण्यावरुन आदिलने मला लाथेने मारलं होतं. त्याच्या शरीरावर लव्ह बाईट्सच्या खुणा होत्या”, असं राखी म्हणाली आहे.

हेही पाहा>> “माझे सर्व पैसे आदिल खानने घेतले”, राखी सावंतचे पतीवर धक्कादायक आरोप; म्हणाली “माझा शारीरिक अन्…”

हेही वाचा>> बीएमडब्ल्यू गाडी, घरासाठी पैसे अन्…; सुकेश चंद्रशेखरकडून नोरा फतेहीने घेतलेले महागडे गिफ्ट

राखी सावंत व आदिलने मे २०२२ मध्ये कोर्ट मॅरेज केलं होतं. त्यानंतर त्यांनी निकाकही केला होता. बिग बॉसच्या घरातून बाहेर येताच राखीने तिच्या लग्नाबाबत खुलासा केला होता. अनेक दिवस ड्रामा केल्यानंतर आदिलने राखीबरोबर लग्न केल्याचं मान्य केलं होतं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-02-2023 at 19:54 IST
ताज्या बातम्या