टीव्हीची ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणारी राखी सावंत मागच्या काही दिवसांपासून पती आदिल खान दुर्राणीबरोबर सुरू असलेल्या वादामुळे चर्चेत आहे. रोजच्या दिवशी ती काही ना काही नवे खुलासे करत असते. नुकताच तिचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात ती स्वतःच्याच कानशीलात मारुन रडताना दिसत आहे. राखीने या व्हिडीओमध्येही पती आदिल खानवर गंभीर आरोप केले आहेत. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

राखी सावंतने अलिकडेच खुलासा केला आहे की ती आदिलला भेटण्यासाठी तुरुंगात गेली होती. पण तो तिच्याशी उद्धट आणि रुक्षपणे बोलला. एवढंच नाही तर आदिलने राखीला धमकी दिली आहे. “जेलमध्ये मी मोठ्या मोठ्या डॉन लोकांना भेटलो आहे. त्यामुळे आता काय करायचं आहे त्याचा विचार कर” असं आदिलने सांगितल्याचा खुलासा राखीने केला होता.

आणखी वाचा- Video: राखी सावंतचा ‘कार’नामा! आदिल खानला तुरुंगात पाठवल्यानंतर गाडीवरुन पुसलं पतीचं नाव, व्हिडीओ व्हायरल

त्यानंतर आता या व्हिडीओमध्ये राखी सावंत पापाराझींशी बोलताना स्वतःवरील ताबा हरवून बसलेली दिसली आणि स्वतःलाचा मारू लागली. डोळ्यात पाणी आणून ती म्हणाली, “मी आदिलवर प्रेम का केलं?” या व्हिडीओमध्ये राखीने आरोप केला आहे की काही मुलींसारखं तिचंही दुर्भाग्य असलं असतं. ज्या मुलींचे मृतदेह फ्रिजमध्ये मिळाले. ती म्हणाली, “माझा मृतदेहही फ्रिजमध्ये सापडला असता. पण मी सुदैवाने मी वाचले.”

आणखी वाचा- धक्कादायक! उर्फी जावेदचं सामान घेऊन कॅब ड्रायव्हर गेला पळून, नंतर नशेत परत आला अन्…

दरम्यान राखीने बिग बॉस मराठीमधून बाहेर पडल्यानंतर आदिल खानबरोबर निकाह झाल्याचा खुलासा केला होता. तिने सोशल मीडियावर लग्नाचे व्हिडीओ आणि फोटो शेअर केले होते. पण त्यानंतर आदिल आणि राखी यांच्यात वाद सुरू झाले. अलिकडेच राखीने आदिलबाबत बोलताना त्याच्यावर मारहाण आणि फसवणुकीचे आरोप केले होते. याशिवाय आदिलचे विवाहबाह्य संबंध असल्याचंही तिने म्हटलं होतं.