scorecardresearch

राखी सावंतचा MeToo चे आरोप असलेल्या साजिद खानला पाठिंबा; म्हणाली, “आरोप करणारे…”

‘बिग बॉस १६’ मध्ये साजिद खानची एन्ट्री झाल्यापासून निर्माते तसेच होस्ट सलमान खान यांच्यावर जोरदार टीका होत आहे.

राखी

‘बिग बॉस १६’ मध्ये MeToo चे आरोप असलेल्या साजिद खानची एन्ट्री झाल्यापासून निर्माते तसेच होस्ट सलमान खान यांच्यावर जोरदार टीका होत आहे. प्रेक्षकांबरोबरच त्याच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप करणाऱ्या अभिनेत्रींनीही साजिद खानला शोमधून काढून टाकण्याची मागणी केली आहे. त्यात शर्लिन चोप्रा ते मंदाना करीमीसह अनेक अभिनेत्रींच्या नावांचा समावेश आहे. मात्र या सगळ्यामध्ये आता राखी सावंतने साजिद खानला पाठिंबा दिला आहे. राखी सावंतने साजिद खानवर इतर महिलांनी लावलेले आरोप हा ‘पब्लिसिटी स्टंट’ असल्याचे म्हटले आहे.

आणखी वाचा : Video: फोटो काढायला आलेल्या चाहत्यावर भडकली शहनाज गिल, म्हणाली, “मी काय तुला…”

राखी सावंत ‘बिग बॉस’च्या काही सीझन्समध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे. ती अनेकदा तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. अलीकडेच राखी सावंतला बॉयफ्रेंड आदिलसोबत तेव्हा गेले असता तिला साजिद खानबद्दल विचारले गेले. तेव्हा राखीने साजिद खानची बाजू घेतली. राखी सावंत म्हणाली, “लोकांनी साजिद खानला जगू द्या, त्याचा इतका तिरस्कार करू नये. साजिद खानच्या विरोधात बोलणाऱ्यांना जाणूनबुजून पब्लिसिटी स्टंट करायचे आहेत. साजिद खान माझा कोणी नाही. पण त्याला माणूस म्हणून जगू द्या. अन्यथा तो आत्महत्या करेल. चारीही बाजूने जर त्याला इतका द्वेष मिळाला तर तो आत्महत्या करेल. साजिद खानला चार वर्षांची शिक्षा भोगून आला आहे. त्यामुळे त्याच्याबरोबर कोणीही काम केले नाही. आता तो बिग बॉसमध्ये स्वतःला आजमावण्यासाठी आला आहे आणि बिग बॉस अशा वादग्रस्त लोकांनाच कार्यक्रमात घेतात.”

पुढे ती म्हणाली, “जर मी बिग बॉसमध्ये गेले तर मी साजिद खानला विचारेन, ‘त्याने खरोखर असे कृत्य केले आहे का? किंवा त्याच्यावर फक्त आरोप केले गेले आहेत?’ कृपया त्याला या सगळ्यापासून वाचवा. त्याला त्याचे नवीन आयुष्य जगू द्या. मला साजिद खानबद्दल वाईट वाटत आहे. तो माझा भाऊ नाही, तसेच मी त्याच्यासोबत कधीही कामही केलेले नाही. मात्र प्रसिद्धी मिळवण्यासाठी प्रत्येकजण हे करत आहे.”

हेही वाचा : राखी सावंतला दुसऱ्याबरोबर रोमान्स करताना पाहून भडकला आदिल खान, प्रकरण गेले मारामारीपर्यंत

साजिद खानला ‘बिग बॉस’च्या घरात पाहून उर्फी जावेदनेही संताप व्यक्त केला होता. अभिनेत्री मंदाना करिमी हिने साजिद खानची ‘बिग बॉस’च्या घरात झालेली एन्ट्री पाहून बॉलिवूडला रामराम ठोकला. मंदाना करिमीने साजिद खानवर मीटू मोहिमेअंतर्गत गंभीर आरोप केले होते.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-10-2022 at 10:22 IST