scorecardresearch

Bigg Boss 17: राखी सावंत पती आदिल खानबरोबर बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार? ड्रामा क्वीन खुलासा करत म्हणाली…

ड्रामा क्वीन राखी सावंत नेमकं काय म्हणाली? जाणून घ्या…

Rakhi Sawant to enter Bigg Boss 17 house with husband Adil Khan Durrani
ड्रामा क्वीन राखी सावंत नेमकं काय म्हणाली? जाणून घ्या…

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शो ‘बिग बॉस’चं १७वं पर्व सुरू होऊन पाच आठवडे झाले आहेत. सध्या शोचा सहावा आठवडा सुरू आहे. परंतु अजूनपर्यंत स्पर्धकांचा खेळ प्रेक्षकांना तितकासा खिळवून ठेवणारा वाटत नाहीये. त्यामुळे निर्मात्यांनी आता या पर्वाचा टीआरपी वाढवण्यासाठी शोमध्ये आणखी वाइल्ड कार्ड स्पर्धकांचा प्रवेश निश्चित केला आहे. यामध्ये ड्रामा क्वीन राखी सावंतचं नाव असल्याचं समोर आलं आहे. राखी सावंत पती आदिल खान-दुरानीबरोबर बिग बॉस घरात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. पण ड्रामा क्वीन खरंच ड्रामा क्वीन पतीसह बिग बॉसमध्ये जाणार की नाही? जाणून घ्या…

हेही वाचा –‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेतील ‘हा’ कलाकार ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस

Sana Khan react on rakhi sawant
Video: राखी सावंत इस्लामची खिल्ली उडवतेय? धर्मासाठी इंडस्ट्री सोडणारी सना खान म्हणाली, “मी खरंच…”
johnny lever gifted gold pendant to namrata sambherao
हास्यजत्रेतील ‘ते’ स्किट पाहून भारवले होते जॉनी लिवर, सेटवर नम्रता संभेरावला दिलेलं महागडं गिफ्ट; म्हणाली, “सोन्याचं…”
Mazhi Tuzhi Reshimgaath Pari Fame Myra vaikul cried at ganesh visarjan video viral
Video: लाडक्या बाप्पाला निरोप देताना ‘परी’ला कोसळलं रडू; म्हणाली, “देवबप्पा, का रे…”
Gutami sai mrunmayi
गौतमी देशपांडे ‘या’ लोकप्रिय अभिनेत्याला करतेय डेट? सई ताम्हणकरच्या कमेंटवर उत्तर देत मृण्मयी म्हणाली…

‘बिग बॉस’च्या १७व्या पर्वाचे दोन आठवडे होताच पहिल्या दोन वाइल्ड कार्ड स्पर्धकांचा शोमध्ये प्रवेश झाला. अभिनेत्री व पूर्वाश्रमीची मिस इंडिया मनस्वी ममगई आणि इशा मालवियाचा सध्याचा बॉयफ्रेंड, अभिनेता समर्थ जुरेल यांनी अचानक बिग बॉस घरात प्रवेश केला. यामधील मनस्वी जास्त काळ शोमध्ये टिकू शकली नाही. ती काही आठवड्यातच बेघर झाली. तर समर्थ अजून शोमध्ये टिकू आहे. अशातच आणखी वाइल्ड कार्ड स्पर्धकांचा प्रवेश निश्चित झाला आहे. त्यामुळे राखी सावंत पती आदिल खान-दुरानीबरोबर बिग बॉसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या वावड्या उठल्या आहेत. पण राखी बिग बॉसमध्ये जाणार नाहीये, याचा खुलासा तिने स्वतः केला आहे.

हेही वाचा – Bigg Boss 17: “त्याने मला प्रपोज अन् किस केली…” बिग बॉसमधून बेघर झाल्यानंतर नावेद सोलचा खुलासा; अभिषेक कुमारबरोबरच्या रिलेशनशिपबद्दल म्हणाला…

‘बॉलीवूड बबल’ या एंटरटेनमेंट वृत्तसंस्थेशी बातचित करताना तिने बिग बॉसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांवर भाष्य केलं. ड्रामा क्वीन राखी सावंत म्हणाली, “हे सर्व काही खोटं आहे. ही बातमी चुकीची आहे. मी सध्या दुबईत आहे.” राखी व्यतिरिक्त भाविन भानुशाली आणि पूनम पांडे हे दोघं वाइल्ड कार्ड स्पर्धेक म्हणून शोमध्ये प्रवेश करणार असल्याची सुद्धा चर्चा सुरू आहे. पण हे दोघं खरंच शोमध्ये प्रवेश करतात की दुसरंच कोणीतरी? हे येत्या काळात स्पष्ट होईल.

हेही वाचा – ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत झळकले ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक; साकारतायत ‘ही’ भूमिका

दरम्यान, अलीकडच्या भागामध्ये बिग बॉसने विकी जैन, अरुण माशेट्टी, सनी आर्या, सना रईस खान आणि अनुराग डोवाल यांना आर्काइव्ह रूममध्ये बोलावले आणि सांगितले की, आज मला तुमच्याकडून परफॉर्मन्स रिव्ह्यू घ्यायचा आहे. यानंतर बिग बॉसने त्यांना तीन स्पर्धकांची नावे सांगण्यास सांगितली, ज्यांना याआधीच शोमधून बाहेर काढायला पाहिजे होते. यावर सर्वांनी जिग्ना व्होरा, रिंकू धवन आणि नावेद सोल यांची नावं सांगितली. त्यामुळे यामधील नावेद आता शोमधून बाहेर झाला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rakhi sawant to enter bigg boss 17 house with husband adil khan durrani pps

First published on: 21-11-2023 at 21:02 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×