Premium

राखी सावंत देणार अभिनयाचे धडे, दुबईत सुरु करणार अक्टिंग अकॅडमी, म्हणाली, “आता लवकरात लवकर…”

याच अ‍ॅकॅडमीच्या उद्घाटनासाठी राखी नुकतीच दुबईला रवाना झाली आहे.

rakhi_sawant-1

हिंदी मनोरंजनसृष्टीत ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री राखी सावंत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. दिवसांपूर्वी राखी सावंत ने तिचा पती आदिल खानवर गंभीर आरोप केल्यानंतर आता तो पोलिसांच्या ताब्यात आहे. प्रताशातच राखीने नवीन सुरुवात करण्याचं ठरवलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राखी सावंत नुकतीच दुबईला रवाना झाली. या दरम्यानचा तिचा एक व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. यात ती मुंबई विमानतळावर दिसत असून तिने तिच्या नव्या इनिंग ची माहिती चाहत्यांची शेअर केली. ती लवकरच दुबईत तिची स्वतःची अ‍ॅकॅडमी सुरू करत असल्यास तिने सांगितलं.

आणखी वाचा : “आदिलने माझे न्यूड व्हिडीओ काढले आणि…” राखी सावंतचा धक्कादायक खुलासा

याच अ‍ॅकॅडमीच्या उद्घाटनासाठी राखी दुबईला रवाना झाली आहे. या तिच्या नवीन अ‍ॅक्टिंग अ‍ॅकॅडमीचं नाव ‘राखी सावंत अकॅडमी’ असं आहे. राखीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून तिचा एक व्हिडीओ पोस्ट केला. यात ती म्हणाली, “मी आता विमानतळावर आहे आणि दुबईला जाण्यासाठी सज्ज आहे. तुम्ही उत्सुक आहात ना? माझी अ‍ॅकॅडमी सुरू होत आहे. राखी सावंत अकॅडमी. लवकरात लवकर या अ‍ॅकॅडमीत प्रवेश घ्या. मीही बघते दुबईतून या अ‍ॅकॅडमीत प्रवेश घ्यायला कोण कोण येतंय.”

हेही वाचा : “त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला…” एमसी स्टॅनचे धक्कादायक विधान

आता तिच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. काहीजण नवीन अ‍ॅकॅडमी सुरू केल्याबद्दल तिचा कौतुक करत आहे तर काहींनी तिला ट्रोल केलं आहे. एका नेटकऱ्याने लिहिलं, “तुला भेटायला दुबईत कोण येणार! तू काय नोरा फतेही आहेस?” तर दुसरा नेटकरी म्हणाला, “हिच्याकडून अभिनय शिकण्यापेक्षा मी हे क्षेत्रच निवडणार नाही.” तर या सोबतच अनेकांनी तिला तिच्या या नव्या इनिंगसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-02-2023 at 13:10 IST
Next Story
केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनी शेअर केला अ‍ॅक्टिंगच्या दिवसांतील Throwback फोटो; म्हणाल्या, “आमचाही…”