Ramayan fame Kush aka Mayuresh Kshetramade: रणबीर कपूरची प्रमुख भूमिका असलेला रामायण हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यातील रणबीर कपूरचा लूक पाहून प्रेक्षकांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केल्याचे पाहायला मिळाले. तसेच, कित्येकांनी चित्रपट पाहण्याची उत्सुकतादेखील दाखवली. याच निमित्ताने रामायण या मालिकेचीदेखील मोठ्या प्रमाणात चर्चा झाली.

रामानंद सागर दिग्दर्शित रामायण ही मालिका प्रचंड गाजली होती. त्यातील प्रत्येक पात्राची वेगळी लोकप्रियता होती. राम, सीता, लक्ष्मण, हनुमान, भरत या आणि मालिकेतील इतर सर्वच पात्रांना मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.

‘रामायण’मधील कुश ‘या’ क्षेत्रात करतोय काम

याच मालिकेतील लव-कुश या भावंडांच्या जोडीनेदेखील प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले होते. लव ही भूमिका मयूरेश क्षेत्रमाडे याने साकारली होती; तर कुश या भूमिकेत स्वप्नील जोशी दिसला होता.

या मालिकेदरम्यान स्वप्नील केवळ नऊ वर्षांचा होता. रामायण या मालिकेबरोबरच त्याने रामानंद सागर यांच्या कृष्ण या मालिकेत कृष्णाची भूमिका साकारली होती. त्याच्या या भूमिकेलासुद्धा प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. आज स्वप्नीलने मनोरंजनसृष्टीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यानंतर स्वप्नीलने ब्रेक घेतला होता.

त्यानंतर त्याने कॅम्पस या शोमधून पुनरागमन केले होते. त्यानंतर त्याने हद कर दी, फिर कहता है दिल, हरे काँच की चुडियाँ अशा विविध शोमध्ये विविध भूमिका साकारल्या. आता स्वप्नील विविध मराठी सिनेमांतून प्रेक्षकांच्या भेटीला येतो. तसेच, तो सध्या लग्नपंचमी या नाटकातूनदेखील प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्याच्या नाटकाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामध्ये त्याच्याबरोबर अमृता खानविलकरदेखील प्रमुख भूमिकेत आहे.

कुश ही भूमिका साकारणाऱ्या मयूरेशबद्दल बोलायचे, तर त्याने कुश भूमिकेनंतर अभिनय क्षेत्र सोडले. त्याने पुन्हा कोणतीही भूमिका साकारली नाही. पुढे त्याने बिझनेसमध्ये करिअर केले.

सध्या त्याच्या कामाबद्दल बोलायचे, तर तो अमेरिकेतली न्यू जर्सीमधील एका कंपनीचा सीईओ आहे. त्याबरोबरच तो एक यशस्वी लेखकही आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने विदेशातील दोन लेखकांबरोबर मिळून स्पाईट अँड डेव्हलपमेंट हे पुस्तक लिहिले आहे.