Ramayana Sunil Lahri shares Video: रामानंद सागर निर्मित रामायण ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरली होती. ३९ वर्षांपूर्वी ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या मालिकेला प्रचंड लोकप्रियता मिळाली. आजही अनेक जण रामायण ही मालिका पाहतात. रामानंद सागर निर्मित ‘रामायण’मधून अनेक कलाकारांना लोकप्रियता मिळाली. या कलाकारांनी प्रचंड यश पाहिले.
अरुण गोविल यांनी रामायण या मालिकेत प्रभू रामाची भूमिका साकारली होती. त्यांना या भूमिकेतून खूप लोकप्रियता मिळाली. दीपिका चिखलिया यांनी सीतेची भूमिका साकारली होती. अरुण गोविल व दीपिका चिखलिया यांच्याबरोबरच लक्ष्मणाची भूमिका साकारणारे सुनील लहरी, हनुमानाची भूमिका साकारणारे दारा सिंह, तसेच रावणाची भूमिका साकारणारे अरविंद त्रिवेदी या कलाकारांनादेखील प्रचंड लोकप्रियता मिळाली.
सुनील लहरींनी दाखविली शेताची झलक
आता या मालिकेत लक्ष्मणाची भूमिका साकारणारे सुनील लहरी सोशल मीडियावर सक्रिय असतात. ते विविध फोटो, व्हिडीओ पोस्ट शेअर करतात. आता त्यांनी सोशल मीडियावर त्यांच्या फार्महाऊसवरील एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांचा हा व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
सुनील लहरी यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत पाहायला मिळते की, त्यांनी त्यांच्या शेतात विविध प्रकारच्या भाज्या, फळांची झाडे लावली आहेत. त्यांनी व्हिडीओमध्ये सांगितले की, त्यांनी शेतात मेथी, टोमॅटो, मिरची, कोबी, शिमला मिरची, शेवगा, टरबूज, पपई, काजूची झाडे लावली आहेत.
खाने की चीजों में इस कदर मिलावट है जिसका कोई हिसाब नहीं, उन्हें कानून का भी डर नहीं, बेहतर है कि हम अपना खुद उगाए और खाऐ,खेत पर मेरा छोटा सा प्रयास हम सब ने अपनी खिड़कियों पर बालकनी पर यह प्रयास करना चाहिए… pic.twitter.com/gKRsbuf4hF
— Sunil lahri (@LahriSunil) June 11, 2026
व्हिडीओमध्ये सुनील लहरी स्वत: शेतात काम करीत असल्याचे पाहायला मिळते. ते असेही म्हणाले की, त्यांच्या शेतातील सर्व भाज्या व फळे सेंद्रिय पद्धतीने घेतल्या आहेत. मला शेती करायला आवडते. शेतातील कामे करताना मला आनंद मिळतो. त्यांच्या या व्हिडीओवर अनेक जण कमेंट करीत आहेत. कमेंट्स करून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
सुनील लहरी यांनी त्यांच्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीत मोठ्या प्रमाणात यश पाहिले. त्यांचे स्वत:चे प्रॉडक्शन हाऊसही आहे. पण, ते साधेपणाने आयुष्य जगतात.
