scorecardresearch

‘झलक दिखला जा’च्या मंचावर लेकाच्या लग्नाची झलक पाहून नीतू सिंग भावुक, म्हणाल्या…

आता रणबीर-आलियाचा हा लग्नसोहळा पुन्हा छोट्या पडद्यावर अनुभवता येणार आहे.

‘झलक दिखला जा’च्या मंचावर लेकाच्या लग्नाची झलक पाहून नीतू सिंग भावुक, म्हणाल्या…
नितू सिंग | neetu singh

बॉलिवूड सेलिब्रिटीजच्या लग्नाची चांगलीच चर्चा होते, त्यांच्या लग्नातील जेवणाच्या मेनूपासून त्यांनी घातलेले कपडे सगळ्या गोष्टी लोकं फॉलो करतात. विकी-कतरिना, अली-रिचा यांच्या लग्नाबरोबरच सर्वात जास्त चर्चा झाली ती रणबीर-आलिया यांच्या लग्नाची. आता रणबीर-आलियाचा हा लग्नसोहळा पुन्हा छोट्या पडद्यावर अनुभवता येणार आहे.

‘झलक दिखला जा १०’ च्या सेटवर एका स्पर्धकाने आलिया-रणबीरचा लग्नसोहळा स्टेजवर सादर केला आणि त्यामुळे तो प्रेक्षकांना पुन्हा अनुभवता आला आहे. या कार्यक्रमातील स्पर्धक नीती टेलरने तिच्या कोरिओग्राफरबरोबर हा डान्स परफॉर्मन्स बसवला आहे. गुरुवारी शेअर केलेल्या प्रोमोमध्ये हा नवा भाग ‘कपूर स्पेशल’ असून यामध्ये नितू सिंग यांनी हजेरी लावली आहे.

आणखी वाचा : एअरपोर्ट लूकमुळे अंकिता लोखंडे ट्रोल, नेटकरी म्हणाले “कंगना…”

यावेळी या भागात नीती आणि कोरिओग्राफर आकाश थापा यांनी खास आलिया आणि रणबीरची प्रेमकहाणी उलगडून दाखवणारा एक डान्स सादर केला आणि याचा शेवट त्यांच्या लग्नाच्या सोहळ्याने झाला. आपल्या मुलाची प्रेमकहाणी हुबहुब डोळ्यासमोर उलगडत असताना नीतू कपूर फारच भावुक झाल्या आणि त्यांनी स्पर्धकांचे आणि परीक्षक करण जोहर, माधुरी दीक्षित आणि नोरा फतेही यांचे मनापासून आभार मानले.

याबरोबरच सगळ्यांनी रणबीर – आलियासाठी खास ‘नाच पंजाबन’ या गाण्यावर ठेकाही धरला. या कार्यक्रमाची परीक्षक आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित हिनेदेखील नीतू सिंग यांना रणबीर-आलियासाठी खास बाळकृष्णाची मूर्ती भेट दिली आणि त्यांच्या वैवाहिक जीवनासाठी खूप साऱ्या शुभेच्छाही दिल्या. या भागात नीतू सिंग यांनी बऱ्याच गप्पा मारल्या आणि किस्से सांगितले. येत्या वीकेंडमध्ये या भाग कलर्स टेलिव्हिजनवर प्रसारित होणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या