'झलक दिखला जा'च्या मंचावर लेकाच्या लग्नाची झलक पाहून नीतू सिंग भावुक, म्हणाल्या... | ranbir kapoor alia bhatt marriage ceremony recreated on the sets of jhalak dikhla ja season 10 | Loksatta

‘झलक दिखला जा’च्या मंचावर लेकाच्या लग्नाची झलक पाहून नीतू सिंग भावुक, म्हणाल्या…

आता रणबीर-आलियाचा हा लग्नसोहळा पुन्हा छोट्या पडद्यावर अनुभवता येणार आहे.

‘झलक दिखला जा’च्या मंचावर लेकाच्या लग्नाची झलक पाहून नीतू सिंग भावुक, म्हणाल्या…
नितू सिंग | neetu singh

बॉलिवूड सेलिब्रिटीजच्या लग्नाची चांगलीच चर्चा होते, त्यांच्या लग्नातील जेवणाच्या मेनूपासून त्यांनी घातलेले कपडे सगळ्या गोष्टी लोकं फॉलो करतात. विकी-कतरिना, अली-रिचा यांच्या लग्नाबरोबरच सर्वात जास्त चर्चा झाली ती रणबीर-आलिया यांच्या लग्नाची. आता रणबीर-आलियाचा हा लग्नसोहळा पुन्हा छोट्या पडद्यावर अनुभवता येणार आहे.

‘झलक दिखला जा १०’ च्या सेटवर एका स्पर्धकाने आलिया-रणबीरचा लग्नसोहळा स्टेजवर सादर केला आणि त्यामुळे तो प्रेक्षकांना पुन्हा अनुभवता आला आहे. या कार्यक्रमातील स्पर्धक नीती टेलरने तिच्या कोरिओग्राफरबरोबर हा डान्स परफॉर्मन्स बसवला आहे. गुरुवारी शेअर केलेल्या प्रोमोमध्ये हा नवा भाग ‘कपूर स्पेशल’ असून यामध्ये नितू सिंग यांनी हजेरी लावली आहे.

आणखी वाचा : एअरपोर्ट लूकमुळे अंकिता लोखंडे ट्रोल, नेटकरी म्हणाले “कंगना…”

यावेळी या भागात नीती आणि कोरिओग्राफर आकाश थापा यांनी खास आलिया आणि रणबीरची प्रेमकहाणी उलगडून दाखवणारा एक डान्स सादर केला आणि याचा शेवट त्यांच्या लग्नाच्या सोहळ्याने झाला. आपल्या मुलाची प्रेमकहाणी हुबहुब डोळ्यासमोर उलगडत असताना नीतू कपूर फारच भावुक झाल्या आणि त्यांनी स्पर्धकांचे आणि परीक्षक करण जोहर, माधुरी दीक्षित आणि नोरा फतेही यांचे मनापासून आभार मानले.

याबरोबरच सगळ्यांनी रणबीर – आलियासाठी खास ‘नाच पंजाबन’ या गाण्यावर ठेकाही धरला. या कार्यक्रमाची परीक्षक आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित हिनेदेखील नीतू सिंग यांना रणबीर-आलियासाठी खास बाळकृष्णाची मूर्ती भेट दिली आणि त्यांच्या वैवाहिक जीवनासाठी खूप साऱ्या शुभेच्छाही दिल्या. या भागात नीतू सिंग यांनी बऱ्याच गप्पा मारल्या आणि किस्से सांगितले. येत्या वीकेंडमध्ये या भाग कलर्स टेलिव्हिजनवर प्रसारित होणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Video : ‘बिग बॉस’च्या निर्मात्यांनी सलमान खानसाठी तयार केलं आलिशान घर, व्हिडीओ समोर

संबंधित बातम्या

“ओंकारने आधीच सांगितलं असतं तर…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दिग्दर्शक स्पष्टच बोलले
‘माझी तुझी रेशीमगाठ’ फेम अभिनेत्रीची झाली सर्जरी, रुग्णालयातील फोटो शेअर करत मानले डॉक्टरांचे आभार; म्हणते “माझ्या नवऱ्यानेही…”
हातामागावरील साडीपेक्षाही पाठकबाईंची ओढणी ठरली लक्षवेधी, लिहिला आहे खास संदेश
Video : “गुरुजींनी मांडले आहेत समोर चार पाठ…” राणादाने घेतलेला उखाणा ऐकून पाठकबाई लाजल्या अन्…
Video : राखी सावंत-आरोह वेलणकरमध्ये खडाजंगी, म्हणाला “तुझ्या बापाचं…”

व्हिडिओ

ताज्या बातम्या
FIFA फुटबॉल विश्वचषक संपताच ‘974 स्टेडियम’ होणार पूर्णपणे गायब; ‘या’ जादूमागचं खास गुपित, जाणून घ्या
मुंबईः वेबमालिकेच्या नावाखाली अश्लील चित्रीकरण; अभिनेता-दिग्दर्शकाला अटक
Most Wanted आरोपींच्या यादीत नाव नसल्याचं आरोपीनेच FB वर कमेंट करुन सांगितलं; पोलिसांनी आधी Reply केला अन् नंतर…
बॉलिवूडची ‘दामिनी’ पुन्हा झळकणार रुपेरी पडद्यावर; अभिनेत्रीने व्यक्त केली पुनरागमनाची इच्छा
“येणाऱ्या पिढीला त्यांचा…” सचिन पिळगावकरांनी विक्रम गोखलेंना वाहिली श्रध्दांजली