‘रंग माझा वेगळा’ ही मालिका संपली असली तरी या मालिकेतील कलाकार मंडळी आता नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. मालिकेतील कार्तिक म्हणजेच अभिनेता आशुतोष गोखले ‘जर तरची गोष्ट’ या नाटकात महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. तर दीपा म्हणजेच रेश्मा शिंदे सध्या वेगवेगळ्या ठिकाणी दौरे करताना दिसत आहे. तसेच गणेश चतुर्थीच्य मुहूर्तावर श्वेता अर्थात अभिनेत्री अनघा अतुल हिने आनंदाची बातमी दिली. हॉटेल व्यवसायात पदार्पण करत असल्याचं तिनं सोशल मीडियावरून जाहीर केलं. आता ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतील आणखी एका अभिनेत्रीनं चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – Rahul Vaidya And Disha Parmar: मुलीचं नाव काय ठेवणार? राहुल वैद्य म्हणाला, “राशीनुसार…”

‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतील आयेशा म्हणजेच अभिनेत्री विदिशा म्हसकर ‘झी मराठी’च्या नव्या कार्यक्रमातून भेटीस आली आहे. विदिशा ही ‘३६ गुणी जोडी’ या मालिकेत पाहायला मिळत आहेच. पण आता गणेशोत्सवानिमित्ताने ‘झी मराठी’नं सुरू केलेल्या कार्यक्रमात विदिशा दिसत आहे. याबाबत तिनं नुकतीच एक सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे; जी चांगलीच चर्चेत आली आहे.

हेही वाचा – ‘कट्यार काळजात घुसली’नंतर सुबोध भावे झळकणार ‘या’ संगीतमय चित्रपटात; म्हणाला, “अखेर…”

विदिशाने त्या पोस्टमध्ये लिहीलं आहे की, “मागच्यावर्षी मी पहिल्यांदा लालबागच्या राजाला बघितलं, त्याच दर्शन घेतलं. खूप काही मागायच ठरवलेलं…पण प्रत्यक्षात जेव्हा त्याच्या चरणापाशी पोहोचले तेव्हा मात्र सगळं विसरुन त्याच्याकडे बघतचं राहिले. जो मला माझ्यापेक्षा जास्त ओळखतो, मी व्यक्त केलेल्या गोष्टी सत्यात उतरवण्याची ताकद ज्याच्याकडे आहे. मला त्रास देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जो आपोआप धडा शिकवतो त्याच्याकडे मी काय मागणार? त्यामुळेच मी म्हणते की, तो माझा वैयक्तिक बाप्पा आहे. अशाच वेळी माझ्या डोक्यात विचार आला की पुढच्या वर्षीही असंच दर्शन होईल का? आणि तुमचा विश्वास बसणार नाही पण यावर्षी बाप्पाने स्वतःच मला त्याच्या दरबारात यायचं आमंत्रण दिलं… त्याची माहिती, विविध मंडळांची महिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायची, भाविकांशी गप्पा मारण्याची संधी मला मिळाली. आणि मी थेट जाऊन पोहोचले राजाच्या दरबारात… मी विदिशा म्हसकर, तुमचा सगळ्यांचं स्वागत करते. झी मराठी प्रस्तुत ‘बोल बाप्पा’ कार्यक्रमात…तर भेटू…रोज संध्याकाळी ५.०० वाजता फक्त ‘झी मराठी’वर…”

हेही वाचा – Video: पृथ्वीक प्रतापचा कात्रजच्या नयनतारासह शाहरुख खानच्या ‘चलेया’ गाण्यावर जबरदस्त डान्स; पाहा व्हिडीओ

हेही वाचा – ‘देवाला आवडणारा आवाज’; उत्कर्ष शिंदेने आजोबा प्रल्हाद शिंदेंचा दुर्मिळ व्हिडिओ शेअर करत आठवणींना दिला उजाळा, म्हणाला…

विदिशाची ही पोस्ट पाहून कलाकार मंडळींसह तिच्या चाहत्यांनी या नव्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री साक्षी गांधी, मेघन जाधव, सुर्भी भावे, संग्राम समेळ, मधुरा जोशी अशा सगळ्या कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहे. ‘कमाल’, ‘क्या बात है’, ‘मस्तच’, ‘जोरदार’, ‘तुझ्या चेहऱ्यावरील हास्य सगळं काही सांगू जातंय,’ अशा कमेंट विदिशाच्या चाहत्यांनी केल्या आहेत.

हेही वाचा – “पहिल्यांदाच विमानाच्या केबिनमध्ये पाय ठेवला अन्…” अभिनेता संकर्षण कऱ्हाडेनं सांगितला विमानातला अनुभव, म्हणाला…

दरम्यान, ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेपूर्वी विदिशाने बऱ्याच मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘कलर्स मराठी’वरील ‘हे मन बावरे’ या मालिकेतही तिनं खलनायिकेची भूमिका निभावली होती. सावनी असं तिच्या भूमिकेचं नाव होतं, जे चांगलंच गाजलं होतं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rang maza vegla fame actress vidisha mhaskar anchoring new zee marathi show bol bappa pps
First published on: 22-09-2023 at 09:02 IST