scorecardresearch

Video : …अन् रणवीर सिंगने वनिता खरातला मारली घट्ट मिठी, व्हिडीओ शेअर करताच बॉयफ्रेंड म्हणाला…

वनिता खरात व रणवीर सिंगचा व्हिडीओ व्हायरल. व्हिडीओ पाहून अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने केली कमेंट.

Video : …अन् रणवीर सिंगने वनिता खरातला मारली घट्ट मिठी, व्हिडीओ शेअर करताच बॉयफ्रेंड म्हणाला…
वनिता खरात व रणवीर सिंगचा व्हिडीओ व्हायरल. व्हिडीओ पाहून अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने केली कमेंट.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाच्या प्रेक्षक अगदी प्रेमात आहेत. तसेच या कार्यक्रमात काम करणाऱ्या विनोदी कलाकारांचेही लाखो चाहते आहेत. आता रणवीर सिंगही ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चा फॅन झाला आहे. ‘सर्कस’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान रणवीर सिंगने या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली होती. यादरम्यान त्याने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या कलाकारांचे तोंडभरून कौतुक केलं.

आणखी वाचा – …अन् रणवीर सिंगने चक्क प्राजक्ता माळीचा हात पकडला, अभिनेत्रीही भारावली, म्हणाली, “मला त्याच्याशी…”

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ काही कलाकारांनी रणवीरबरोबरचे बरेच फोटो सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केले. आता वनिता खरातने रणवीरबरोबरचा फोटो व व्हिडीओ सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत.

वनिताने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये रणवीर तिला घट्ट मिठी मारताना दिसत आहे. तर एका फोटोमध्ये त्याने वनिताबरोबर सेल्फी घेतला आहे. रणवीर आपल्याबरोबर आहे हे पाहूनच वनिताचा आनंद गगनात मावेनासा झाला. तिने म्हटलं, “सच्ची मे तेरे जैसा कोई हार्डीच नही हैं. या माणसाला भेटल्यावर खरंच असं वाटलं या साला एनर्जीचं करायचं काय?”

वनिता रणवीरला भेटून अगदी भारावून गेली होती. तर वनिताची ही पोस्ट पाहून तिचा बॉयफ्रेंड सुमित लोंढेनेही कमेंट केली. सुमितने हार्ट इमोजी शेअर करत कमेंट केली. तसेच वनिताचे चाहतेही तिचं कौतुक करत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-12-2022 at 17:20 IST

संबंधित बातम्या