Raqesh Bapat’s Ex Wife Ridhi Dogra talks About Marriage : मनोरंजन विश्वात असे अनेक कलाकार आहेत जे घटस्फोटानंतरही एकमेकांच्या संपर्कात आहेत. त्यांच्या पूर्वाश्रमीच्या जोडीदारांबरोबर त्यांचे आजही मैत्रीपूर्ण संबंध आहेत आणि अनेकदा व्यावसायिक जीवनात ते त्यांच्या कामाचं कौतुक करत पाठिंबा देतानाही दिसतात. यापैकीच एक म्हणजे अलीकडेच ‘बिग बॉस मराठी’मुळे चर्चेत आलेला अभिनेता राकेश बापट आणि अभिनेत्री रिद्धी डोगरा.
राकेश बापट व रिद्धी डोगरा लोकप्रिय सेलिब्रिटी कपलपैकी एक होते. दोघांनी आतापर्यंत अनेक कलाकृतींमध्ये काम केलं आहे. राकेशने चित्रपट मालिका आणि रिअॅलिटी शोमध्ये काम केलं आहे तर रिद्धी डोगरा हिंदी टेलिव्हिजन आणि ओटीटीवरील लोकप्रिय चेहरा आहे. तीसुद्धा अलीकडेच आलेल्या ‘द ५०’ या कार्यक्रमात झळकलेली.
राकेश बापट ‘बिग बॉस मराठी’च्या घरात असताना रिद्धीने राकेशला सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत पाठिंबा दिला. दोघेही विभक्त झाले असले तरी अनेकदा एकमेकांना पाठिंबा देताना दिसतात. राकेश व रिद्धी यांनी २०११मध्ये लग्न केलं होतं. परंतू, सात वर्षे एकमेकांबरोबर संसार केल्यानंतर दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आणि २०१७मध्ये या जोडीचा घटस्फोट झाला. असं असली तरी दोघे अनेकदा एकमेकांबद्दल बोलत असतात. राखी सावंतने ‘फिल्मी ग्यान’ला दिलेल्या मुलाखतीत राकेश रिलेशनशिपमध्ये असून त्याची गर्लफ्रेंड पुण्यात राहत असल्याचं म्हटलं होतं.
राखीने दिलेल्या माहितीनुसार तो रिलेशनशिपमध्ये असून आता रिद्धीनेसुद्धा ती पुन्हा एका नवीन नात्यासाठी तयार आहे आणि तिला तिच्या जोडीदारामध्ये कोणते गुण हवे आहेत याबद्दल युविका चौधरीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. युविका नेमकं काय म्हणाली याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…
राकेश बापटच्या एक्स पत्नीला ‘असा’ जोडीदार हवाय
मुलाखतीत रिद्धीला लग्नासाठी कसा मुलगा हवा आहे असं विचारल्यानंतर ती म्हणाली, “मला असा मुलगा हवा आहे जो स्वावलंबी असेल. ज्याने स्वबळावर गोष्टी मिळवल्या असतील आणि ज्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं महत्त्व माहीत असेल. असा व्यक्ती जो त्याच्यामध्ये आनंदी असेल कारण मी माझ्या आयुष्यात एका अशा टप्प्यावर आहे जिथे मी आनंदी आहे. मी खूप स्वातंत्र मुलगी आहे. मी माझी काळजी घेऊ शकते, आर्थिक गोष्टी सांभाळू शकते, घर चालवू शकते. पुरुषांचं असं असतं की आम्ही करणार, आम्ही बघणार. त्यामुळे मला असा मुलगा हवा आहे ज्याला माहीत असेल की मी खूप खंबीर स्त्री आहे. असा कोणी असेल तर मीच त्याच्या प्रेमात पडेन.”
