Bigg Boss Marathi 6 Day 25 Updates : बिग बॉस मराठी ६ मध्ये कॅप्टन्सी टास्क सुरू आहे. या टास्कमध्ये चांगलाच गदारोळ झाला. टास्कदरम्यान रुचिता व राकेश बापटचं जोरदार भांडण झालं. त्यानंतर राकेश बापट घरात रुचिता राहणार किंवा तो राहणार असं म्हणताना दिसला.
कलर्स मराठीने बिग बॉस मराठी ६ चा २५ व्या दिवसाचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये सुरुवातीला रुचिता ‘खेळायचं तर खेळा, नाहीतर जा घरी’ असं म्हणताना दिसते. त्यावर भडकलेला राकेश बापट तिला फालतू म्हणतो. त्यानंतर रुचिता त्याला “तू फालतू बे” असं म्हणते. तेव्हा अनुश्री तिला “तू कशाला बोलतेस” असं म्हणून अडवते. तरीही रुचिता राकेशला म्हणते, “अरे एक नंबरचा नाटकी माणूस आहे.” त्यानंतर राकेश ओरडून ओरडून तिला गप्प बसायला सांगतो. मग राकेश कॅमेऱ्याकडे बघून म्हणतो, “एक तर ती राहील या घरात किंवा मी राहीन.” राकेश नंतर बेडरूममध्ये जातो आणि संताप व्यक्त करताना व्हिडीओत दिसतंय.
हा प्रोमो पाहिल्यावर नेटकरी राकेश बापटची बाजू घेत आहेत. ‘रुचिता म्हणजे नाचता येईना अंगण वाकडं. हिला नुसता आरडा ओरडा जमतो. विशालच्या जीवावर खेळती. घरात सगळ्यात जास्त रडकी’, ‘किती शांतपणे खेळत होता…रुचिताला आग लावल्याशिवाय गप्पच बसवत नाही, प्रत्येक टास्कचं वाटोळं करते.. काय बोललीस गं ज्यामुळे एवढा चिडला तो, आम्ही राकेशबरोबर आहोत… लढ बिनधास्त,’ ‘रुचिता प्लेयर छान आहे पण तोंड तिचा चिखल खायला जातो एकदा उघडला की …. कानाला त्रास होतो तीचा आवाज एवढी बोंबलते’, ‘आरे हिला बाहेर काढा रे यार बिग बॉस बघायची इच्छा मरत आहे हिच्या मुळे’, अशा कमेंट्स प्रोमोवर आहेत.

