scorecardresearch

अण्णा नाईक पुन्हा एकदा झळकणार खलनायकाच्या भूमिकेत; पोस्टर आले समोर

मालिकेतील अण्णा नाईक हे पात्र विशेष गाजले या मालिकेने त्यांना वेगळी ओळख मिळवून दिली

अण्णा नाईक पुन्हा एकदा झळकणार खलनायकाच्या भूमिकेत; पोस्टर आले समोर
फोटो सौजन्य : लोकसत्ता

‘रात्रीस खेळ चाले २’ ही मालिका चांगलीच गाजली. यातील अण्णा नाईक हे पात्र प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे. अत्यंत धूर्त, कपटी असे हे पात्र होते. अभिनेते माधव अभ्यंकर यांनी ते पात्र साकारले होते. त्यांच्या कामाचे सर्वत्र कौतुक झाले होते. ते बऱ्याच वर्षांपासून या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. या अजरामर भूमिकेमुळे त्यांना नवी ओळख मिळाली. आता पुन्हा एकदा ते अशाच भूमिकेत दिसणार आहेत.

स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहेत. आता त्यात एका नव्या मालिकेची भर पडणार आहे. त्या मालिकेचे नाव आहे ‘ठरलं तर मग’, यामालिकेत काही नवीन चेहरे दिसणार आहेत. माधव अभ्यंकर हे महिपत नावाची व्यक्तिरेखा साकारणार आहेत जी अत्यंत दुष्ट, कपटी अशी असणार आहे. या मालिकेत बिग बॉस फेम अभिनेत्री मीरा जगन्नाथदेखील आहे. ही मालिका ५ नोव्हेंबरपासून सोमवार ते शनिवार रात्री ८.३० ला प्रेक्षेपित होणार आहे. वाहिनीने पोस्ट शेअर करत ही माहिती दिली.

माधव अभ्यंकर हे नुकतेच ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत जयंतीलाल मेहता यांच्या भूमिकेत दिसले आहेत. माधव अभ्यंकर मूळचे पुण्याचे असून गेली अनेकवर्ष ते मालिका, नाटक, चित्रपट या माध्यमांमध्ये काम करत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-12-2022 at 19:57 IST

संबंधित बातम्या