‘स्प्लिट्सव्हिला’, ‘एमटीव्ही ऐस ऑफ स्पेस’, ‘बिग बॉस ओटीटी’ अशा रिअ‍ॅलिटी शोमधून घराघरात पोहोचलेली दिव्या अग्रवाल सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. पण कारण लग्न, घटस्फोट किंवा आगामी कामामुळे नव्हे तर फसवणुकीचा आरोप तिच्यावर लावण्यात आला आहे. दिव्या व तिचा पती अपूर्व पाडगांवकरने एका दलाला फसवल्याचं समोर आलं आहे. या दलालाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे.

रफिक मर्चंट असं या दलालाचं नाव आहे. या दलालने त्याच्या व्हिडीओत म्हटलं आहे, “दिव्या अग्रवाल प्लीज माझी दलाली दे. माझा एक टक्का हिस्सा मला देऊन टाक. मी तुला लोढा बेल एअरमध्ये फ्लॅट घेऊन दिला होता. तू होकार देत मिटिंगमध्ये, नोंदणीसाठीही आली होती. त्यानंतर तू फोन उचलणं बंद केलं आणि मला ब्लॉक केलं. मेसेज, डीएम, सगळ्या ठिकाणी ब्लॉक केलं. तू अशी का करत आहेस?”

vivek oberoi says after bollywood ostracized him he focused on business
बॉलीवूडने बहिष्कार टाकल्यावर व्यवसाय करून घर चालवलं; विवेक ओबेरॉय वस्तुस्थिती मांडत म्हणाला, “आज २९ कंपन्यांमध्ये…”
IAS Puja Khedkar
IAS Pooja Khedkar : पूजा खेडकरचा आणखी एक प्रताप समोर; दिव्यांग असल्याचे सांगून UPSC परीक्षेत मिळवली सूट
Mukesh Ambani invited to Marathi actor Shreyas Raje on him son Anant Ambani wedding
मुकेश अंबानींनी ‘या’ मराठी अभिनेत्याला दिली मुलाच्या लग्नाची पत्रिका, फोटो शेअर करत म्हणाला, “आता जावं लागेल लग्नाला…”
pooja khedkar ias news in marathi
IAS पूजा खेडकर यांचे कारनामे दिल्लीपर्यंत पोहोचले; थेट पंतप्रधान कार्यालयानं घातलं लक्ष, LBSNAA नंही मागवला अहवाल!
Suchitra Krishnamoorthi attended naked party
बर्लिनमध्ये Naked Party मध्ये सहभागी झाली बॉलीवूड अभिनेत्री, २० मिनिटांत काढला पळ; म्हणाली, “मला कुणाचेही प्रायव्हेट पार्ट…”
Divyanka Tripathi and Vivek Dahiya robbed in Florence
पासपोर्ट, पैसे अन् १० लाखांचे सामान लुटले; अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीला विदेश ट्रिपवर आला वाईट अनुभव, पोलिसांनी केली नाही मदत
Pooja Khedkar First Reaction
Pooja Khedkar : वादानंतर IAS पूजा खेडकर पहिल्यांदाच आल्या माध्यमांसमोर; घडल्या प्रकाराबाबत विचारणा केली असता म्हणाल्या…
Marathi actress madhurani prabhulkar praised to hemangi kavi for Tauba Tauba tutorial
Video: “तुझा अभिमान आहे”, हेमांगी कवीचा ‘तो’ व्हिडीओ पाहून मधुराणी प्रभुलकरची प्रतिक्रिया, अभिनेत्रीनं नेमकं काय केलं? जाणून घ्या…

हेही वाचा – ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटातील गाण्यासंदर्भात सचिन पिळगांवकरांनी दिली हिंट; ‘या’ लोकप्रिय गायकासह गायलं आहे गाणं

पुढे रफिक म्हणाला, “अपूर्व पाडगांवकर तू एक प्रसिद्ध सेलिब्रिटी आणि उद्योगपती आहेस. तू पण असं का करतोय? माझ्या हक्कावर का दबाव टाकताय? कुठेही मारहाण करा, पण माझ्या पोटावर पाय देऊ नका. कृपा करून माझी एक टक्का असलेली दलाली द्या. तुम्ही बोलला होता की, तुम्ही खरेदी केला आणि विकला. तुम्हाला काही फायदा झाला नाही. नुकसान झालं. तर मी काय करू? जेव्हा तुम्हाला खरेदी करायचं होतं, तेव्हा तुम्हाला मदत केली. त्यानंतर विकला आणि भाड्याने देखील दिला. पण माझा हिस्सा मला द्या. माझी एक टक्का दलाली द्या. तुम्ही इतके मोठे सेलिब्रिटी असूनही असं कसं करू शकता?”

“मी दिव्या आणि अपूर्वच्या मित्रांना विनंती करतो की, तुम्ही त्यांना समजवा. मी माझं काम केलं. पण त्यांनी दलाली दिली नाही. माझी काहीच चुकी नाही. कृपा करून माझी दलाली द्या,” असं दलाल रफिकने म्हटलं आहे.

हेही वाचा – मुकेश अंबानींनी ‘या’ मराठी अभिनेत्याला दिली मुलाच्या लग्नाची पत्रिका, फोटो शेअर करत म्हणाला, “आता जावं लागेल लग्नाला…”

हेही वाचा – अशोक सराफ न चुकता रोज पाहतात ‘ही’ लोकप्रिय मालिका; अभिनेत्रीने पोस्ट करून केला खुलासा

दरम्यान, काही दिवसांपूर्वी दिव्या अग्रवालने सोशल मीडियावरील लग्नाचे फोटो डिलीट केल्यामुळे तिच्या घटस्फोटाच्या वावड्या उडल्या होत्या. पण दिव्याने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करून या चर्चांना पूर्णविराम दिला.