'नवरी मिळे हिटलर'ला या 'झी मराठी' वाहिनीवरील मालिकेने आपला स्वतंत्र चाहतावर्ग निर्माण केला आहे. मालिकेतील ट्विस्टमुळे प्रेक्षकांचे पुढे काय होणार, ही उत्सुकता कायम टिकून असते. आता झी मराठी वाहिनीने या मालिकेचा नवीन प्रोमो प्रदर्शित केला आहे. 'झी मराठी वाहिनी'ने इन्स्टाग्रामच्या अधिकृत अकाउंटवर 'नवरी मिळे हिटलरला' या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित केला आहे. या प्रोमोमध्ये विक्रांतने लीला आणि त्याच्या बायकोला दोरीने बांधून ठेवल्याचे पाहायला मिळत आहे. तो त्यांच्याभोवती रॉकेल ओतून पेटवलेली काडी त्यांच्या अंगावर टाकणार इतक्यात एजे त्याला थांबवत असल्याचे पाहायला मिळते. विक्रांतचा खरा चेहरा एजेसमोर येणार. प्रोमोच्या सुरुवातीला लीला मोठ्याने मदतीसाठी ओरडत असल्याचे पाहायला मिळते. ती वाचवा, हेल्प म्हणत असते; तोपर्यंत विक्रांत येतो आणि तिच्या जखमांवर जोरात दाबतो. लीला रडत असते. त्यानंतर विक्रांत त्या दोघींच्या भोवती रॉकेल ओततो. ते पाहून लीला त्याला म्हणते, विक्रांत तू हे काय करतोयस? मूर्खपणा करू नकोस, थांब. पण, तो काडी पेटवतो. लीला आणि विक्रांतची बायको घाबरलेल्या असतात. तितक्यात एजेची एंट्री होते आणि त्याच्या हातातली पेटलेली काडी ते विझवतात. एजे आलेले पाहताच विक्रांतच्या चेहऱ्यावर घाबऱल्याचे भाव दिसत आहेत. अशाप्रकारे विक्रांतचा खरा चेहरा एजेसमोर आल्याचे पाहायला मिळत आहे. झी मराठी इन्स्टाग्राम दरम्यान, याआधी मालिकेत दाखवल्याप्रमाणे लग्न झालेले असतानादेखील विक्रांत हा लीलाची बहीण रेवतीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून फसवत असतो. ही गोष्ट जेव्हा लीलाला समजते तेव्हा ती एजेची मदत मागते. एजे विक्रांतची पोलिसाची नोकरी घालवतो त्याचा बदला घेण्यासाठी तो एजे आणि लीलाचे लग्न लावून देण्याचे ठरवतो. एजेचे श्वेताबरोबर लग्न होत असताना विक्रांत लीलाच्या बहिणीला किडनॅप करतो आणि लीलाला जर तिची बहिण सुरक्षित पाहिजे असेल तर एजेबरोबर लग्न करण्याची अट घालतो. लीला श्वेताच्या जागी येऊन मंडपात बसते आणि एजेबरोबर लग्न करते. ज्यावेळी ही गोष्ट सगळ्यांसमोर येते, त्यावेळी लीलाने फसवणूक केल्याचे म्हटले जाते. लीला आणि एजे यांच्यामध्ये गैरसमज निर्माण होतात. हेही वाचा: Video : ‘एक दो तीन…’, ३६ वर्षांपूर्वीच्या सुपरहिट गाण्यावर माधुरी दीक्षितचा जबरदस्त डान्स! अमेरिकेतील व्हिडीओ व्हायरल आता विक्रांतचे सत्य समोर आल्यानंतर मालिका कोणते नवे वळण घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. याबरोबरच लीला आणि एजे यांच्यातील गैरसमज दूर होणार का, हे पाहणेदेखील प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचे असल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.