Reshma Shinde and Pooja Birari Dance : सोशल मीडियावर सातत्याने नवनवीन गाणी ट्रेंड होतं असतात. 'सुसेकी', 'तौबा-तौबा' यांसारख्या बऱ्याच सुपरहिट गाण्यांवर कोट्यावधी लोकांनी डान्स व्हिडीओ केला आहे. याचप्रमाणे सध्या एक आगरी गाणं खूप ट्रेंड होतं आहे. मराठी कलाकार मंडळींसह नेटकरी या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. याच ट्रेडिंग गाण्यावर 'घरोघरी मातीच्या चुली'मधील जानकी म्हणजे अभिनेत्री रेश्मा शिंदे व 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेतील मंजिरी अर्थात पूजा बिरारी यांनी जबरदस्त डान्स केला आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. अभिनेत्री रेश्मा शिंदे ( Reshma Shinde ) व अभिनेत्री पूजा बिरारी या खूप चांगल्या मैत्रीणी आहेत. अनेकदा दोघींचे एकत्र फोटो, व्हिडीओ व्हायरल होतं असतात. अशातच आता दोघी 'वाटाण्याचा गोल दाना' या आगरी गाण्यावर थिरकताना दिसल्या. पूजा बिरारीने हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. "आम्ही कोणत्याही गाण्यावर डान्स करू शकतो. पागल पणती तो जरूरी है…खूप दिवसांनी भेटलो…रीलासाठी बोलावलं.शिवानी बोरकर हा डान्स व्हिडीओ शूट केल्याबद्दल धन्यवाद." व्हिडीओमधील दोघींचा डान्स पाहून नेटकऱ्यांनी भरभरून कौतुक केलं आहे. हेही वाचा - Video: “…और मिला क्या है मुझे इस देश से”, कंगना रणौत यांच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित View this post on Instagram A post shared by Pooja Birari (@biraripooja) 'एक नंबर', 'व्वा', 'कडक', 'सुपर', 'मस्त', 'खूप भारी', 'क्या बात है', 'व्वा खूप मज्जा आली', 'अगं मंजिरी काय गं हे बाई', 'लय भारी', 'खूप सुंदर' अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी रेश्मा शिंदे ( Reshma Shinde ) व पूजा बिरारीच्या व्हिडीओवर दिल्या आहेत. हेही वाचा – “जान्हवी खूप भोळी आहे”, ‘बिग बॉस’मधील मैत्रिणीबद्दल मराठी अभिनेत्याचं वक्तव्य, म्हणाला, “ती मॉडर्न दिसते पण…” दरम्यान, सध्या मराठी मालिकाविश्वातील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक रेश्मा शिंदे ( Reshma Shinde ) व पूजा बिरारी आहेत. 'घरोघरी मातीच्या चुली' आधी रेश्माने 'रंग माझा वेगळा' मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. मालिकेमधील तिची दीपा भूमिका सुपरहिट झाली होती. तसंच पूजाने 'येड लागलं प्रेमाचं' आधी 'स्वाभिमान' मालिकेत काम केलं होतं. या मालिकेतील तिची पल्लवी भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली होती.