Reva Kaurse on relationship with Raqesh Bapat: जानेवारी २०२६ मध्ये बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाची सुरुवात झाली होती. या पर्वात एकूण १७ स्पर्धक सहभागी झाले होते. राधा पाटील, सोनाली राऊत, रुचिता जामदार, दिपाली सय्यद, सागर कारंडे, सचिन कुमावत, तन्वी कोलते, आयुष संजीव, करण सोनावणे, प्रभु शेळके, प्राजक्ता शुक्रे, अनुश्री माने,राकेश बापट, रोशन भजनकर, दिव्या शिंदे, ओमकार राऊत, विशाल कोटियन हे स्पर्धक सुरुवातीला सहभागी झाले. त्यानंतर राखी सावंतची वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली.
राखीनंतर आणखी तीन स्पर्धक वाईल्ड कार्ड म्हणून आले. यामध्ये रेवा कौरसे, संकेत पाठक आणि संस्कृती सांळुखे या तीन जणांचा समावेश होता. सध्या बिग बॉसचे हे पर्व अंतिम टप्प्यात आहे.
टॉप ५ स्पर्धकांनी अंतिम टप्प्यात प्रवेश केला आहे. राकेश बापट, अनुश्री माने, तन्वी कोलते, दिपाली सय्यद, विशाल कोटियन हे पाच स्पर्धक ट्रॉफी जिंकण्यापासून एक पाऊल दूर आहेत. या पाचपैकी कोणता सदस्य ट्रॉफी जिंकणार हे पाहणे महत्वाचे आहे.
आता नुकतीच रेवा कौरसे घराबाहेर पडली. ती घरात असताना राखीने रेवा व राकेश यांच्या नात्याबद्दल वक्तव्य केले होते. तसेच, त्यांच्यातील मैत्री पाहून राखीने अनेकदा राग व्यक्त केला होता.
रेवा व राकेश यांच्यातील जवळीक राखीला आवडली नाही, त्यामुळे तिने रेवाविरुद्ध अनेक गोष्टी केल्या होत्या. आता घराबाहेर पडल्यानंतर रेवाने राकेश बापटबरोबर कसे नाते होते, त्याच्याबरोबर कसे बॉण्डिंग होते, यावर वक्तव्य केले आहे.
“त्याच्याबरोबर खूप चांगली…”
रेवाने नुकतीच राजश्री मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत राकेशबरोबर असणाऱ्या नात्याबद्दल ती म्हणाली, “माझी आणि राकेशची चांगली मैत्री होती. त्याव्यतिरिक्त काहीच नव्हते. बाकीचे राखीच्या मनाचे खेळ होते. तिला असं वाटत होतं की, कदाचित माझ्या आणि राकेशमध्ये नातं निर्माण होईल. तसं, काही होऊ नये म्हणून तिने भांडण करण्यास सुरुवात केली होती. पण, राकेश व माझ्यात तसं काहीच नव्हतं. तसं असतं तर स्क्रीनवर दिसलं असतं. त्याच्याबरोबर खूप चांगली बॉण्डिंग होती. तो एक चांगला माणूस आहे. तो सुद्धा मला असं म्हणायचा की खरंच तू खूप चांगली आहे. तू हुशार आहेस, तू संवेदनशील आहेस.तो मला नन्हीं परी असंही म्हणायचा. तशी एक आमच्यात बॉण्डिंग होती. कारण- आम्ही एकाच ग्रुपमध्ये होतो.खेळाबद्दलही आमच्यात चर्चा व्हायच्या.त्याव्यतिरिक्त आमच्यात काहीच नव्हतं. आम्ही त्याला चिडवायचो.”
राखीने बिग बॉसच्या घरात आणि त्यानंतर अनेक मुलाखतीमध्ये राकेश बापटवर तिचे एकतर्फी प्रेम असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, आता राकेश, तन्वी , अनुश्री, विशाल, आणि दिपाली यापैकी कोणता स्पर्धक ट्रॉफी जिंकणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
