'बिग बॉस मराठी'(Bigg Boss Marathi )चे पाचवे पर्व सध्या चांगलेच चर्चेत आहे. स्पर्धकांच्या विविध गोष्टींमुळे हे पर्व गाजताना दिसत आहे. या सीझनचा दुसरा आठवडा आता पूर्ण झाला असून, भाऊचा धक्का या एपिसोडमध्ये धमाल रंगलेली पाहायला मिळाली आहे. या एपिसोडमध्ये 'खेल खेल में' चित्रपटातील कलाकारांनी हजेरी लावली आहे. आता 'कलर्स मराठी वाहिनी'ने सोशल मीडियावर एक प्रोमो प्रदर्शित केला आहे. या प्रोमोमध्ये 'बिग बॉस'च्या पाचव्या पर्वाचा सूत्रसंचालक रितेश देशमुख आणि अक्षय कुमार हे स्पर्धकांची मजा घेताना दिसले आहेत. 'कलर्स मराठी' वाहिनीने इन्स्टाग्रामवर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, स्पर्धकांचे फोन रितेश देशमुख आणि अक्षय कुमार यांच्याकडे आहेत. महत्वाचे म्हणजे त्या फोनमधील स्पर्धकांचे मेसेज ते मोठ्याने वाचून दाखवीत आहेत. स्पर्धकांची गुपितं फोनमधून बाहेर येणार. प्रोमोच्या सुरुवातीला अक्षय कुमार बिग बॉसच्या घरातील सदस्यांना विचारतो, हा कोणाचा फोन आहे? त्यावर आर्या, माझा फोन आहे असे उत्तर देते. मग अक्षय कुमार म्हणतो की, आता मी यातले कुठलेही दोन मेसेज वाचणार आहे. त्यावर ती, नाही, असे म्हणताना दिसत आहे. रितेश म्हणतो की, नाव वाचू? त्यावर ती म्हणते की, आईच्या नावावर जा. रितेश तिला, तुमच्या आईचे मेसेज कशाला वाचू, असे म्हणताना दिसत आहे. रितेश म्हणतो की, साक्षीचा मेसेज वाचायचा आहे? त्यावर ती वाचा म्हणते आणि 'साक्षी २', असे म्हटल्यावर नाही म्हणते. तिने दिलेल्या प्रतिक्रियेवर सगळे हसताना दिसत आहेत. कलर्स मराठी इन्स्टाग्राम त्यानंतर रितेश देशमुखने अरबाजचे नाव घेत त्याला फोन दाखविल्यावर तो म्हणतो की, सर, मी पासवर्डच विसरलो आहे. त्यानंतर इरिनाला संबोधत,अविना तू मला खूप आवडते, हा मेसेज इरिनाच्या फोनमधून अक्षय कुमार वाचतो. त्यावर रितेश देशमुख इरिनाला विचारत असतो की, त्या व्यक्तीचं नाव घेऊ का? तेवढ्यात अक्षय कुमार, "चंदू", असे म्हणताना दिसत आहे. त्यावर सगळे हसताना दिसत आहेत. हेही वाचा: Video: शाहरुख खानने म्हाताऱ्या माणसाला ढकलले, नेटकरी ट्रोल करत म्हणाले, “तो चांगले असण्याचे नाटक…” दरम्यान, हा प्रोमो प्रदर्शित करताना 'कलर्स मराठी'ने भाऊच्या धक्क्यावर आज कल्ला होणार, कोणाच्या फोनमधून कोणते सीक्रेट बाहेर पडणार, अशी कॅप्शन दिली आहे. आता हा प्रोमो प्रदर्शित झाल्यानंतर कोणत्या स्पर्धकाचे कोणते गुपित सर्वांसमोर येणार, भाऊच्या धक्क्यावर आणखी काय घडणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.