Bigg Boss Marathi 5 वे पर्व सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. बिग बॉसच्या घरात स्पर्धकांमध्ये होणारे वाद-विवाद वा भांडणे, बिग बॉसनं स्पर्धकांना दिलेला टास्क यांमुळे तर अनेकदा ‘भाऊच्या धक्क्या’मुळे बिग बॉसच्या पाचव्या पर्वाची मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसते. बऱ्याच वेळा रितेश देशमुखच्या सूत्रसंचालनाबाबतही बोलले जाते. आता तिसऱ्या पर्वात सहभागी झालेल्या मीनल शाहने बिग बॉसच्या पाचव्या पर्वाबद्दल वक्तव्य केले आहे.

काय म्हणाली मीनल शाह?

मीनल शाहने ‘स्टार मीडिया मराठी’ला नुकतीच मुलाखत दिली. यावेळी महेश मांजरेकर या सीझनमध्ये असते, तर काय चित्र बदललं असतं, या प्रश्नाचे उत्तर देताना तिने म्हटले, “पूर्ण चित्र बदललं असत. मी एक सांगते की, रितेशसर त्यांच्या पद्धतीनं छान होस्ट करीत आहेत; पण ते या शोसाठी खूपच चांगले आहेत. या शोसाठी असा कोणीतरी होस्ट पाहिजे, अशी कोणीतरी व्यक्ती पाहिजे, जी आमच्यासारख्या बंडखोर स्पर्धकांची ‘चांगली शाळा’ घेऊ शकेल. महेशसर त्यांच्यासाठी परफेक्ट आहेत.”

त्याबद्दल अधिक बोलताना मीनल म्हणते, “मी हे नाही म्हणत की, महेशसर माझ्या सीझनमध्ये होते आणि बाकीचे सीझन त्यांनी होस्ट केलं म्हणून त्यांना घेतलं पाहिजे. मला वाटतं की, त्यांना माहितेय की अशा स्पर्धकांना कसं सरळ करायचं ते. रितेशसर त्यांच्या पद्धतीनं मुद्दे स्पर्धकांपर्यंत पोहोचवतात आणि एकदमच चांगल्या पद्धतीनं स्पर्धकांना समजवतात. पण, बिग बॉसच्या घरात जाणाऱ्या स्पर्धकांना चांगली पद्धत समजत नाही. त्यांना ‘शाळा’ घेऊनच समजावलेलं कळतं. मला असं वाटतं की माझ्यासोबत खूप प्रेक्षकांना महेशसरांची आठवण येतेय. त्यांची जी चावडी असायची, ती धमाल असायची. महेशसरांच्या होस्टिंगची आठवण येते.”

हेही वाचा: Video : टास्क हरल्यानंतर निक्कीने सूरजला समजावलं, म्हणाली, “तू वाईट….”, व्हिडीओ पाहताच नेटकरी म्हणाले, “ती घाबरली….”

महेशसर असते, तर सगळ्यात जास्त कोणाची शाळा घेतली असती? यावर बोलताना तिने म्हटले, “निक्कीची खूप शाळा घेतली असती. आमच्या सीझनमध्ये मीरा होती. तिची खूप शाळा घेतली जायची. निक्की तिच्यापेक्षा १० पटींनी जास्त आहे. पूर्ण सीझनमध्ये ती गोंधळ घालतेय. महेशसर असते, तर तिची चांगलीच शाळा घेतली असती. आणि माझा विश्वास आहे, तिच्यामध्ये चांगले बदल दिसले असते.”

मीनल शाह ही बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.

दरम्यान, गेल्या आठवड्यात वैभव चव्हाणला कमी मते मिळाल्यामुळे त्याला घराबाहेर पडावे लागले आहे. तर आर्याने निक्कीला कानशिलात लगावल्याने तिला शिक्षा म्हणून घराबाहेर काढण्यात आले आहे. आता या आठवड्यात नॉमिनेशनसाठी जंगलराज हा टास्क दिला होता. त्यामध्ये निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर, सूरज चव्हाण, अरबाज पटेल व वर्षा उसगांवकर हे स्पर्धक बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत. आता या आठवड्यात घरात काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, गेल्या आठवड्यात वैभव चव्हाणला कमी मते मिळाल्यामुळे त्याला घराबाहेर पडावे लागले आहे. तर आर्याने निक्कीला कानशिलात लगावल्याने तिला शिक्षा म्हणून घराबाहेर काढण्यात आले आहे. आता या आठवड्यात नॉमिनेशनसाठी जंगलराज हा टास्क दिला होता. त्यामध्ये निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर, सूरज चव्हाण, अरबाज पटेल व वर्षा उसगांवकर हे स्पर्धक बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत. आता या आठवड्यात घरात काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.