Bigg Boss Marathi 5 Updates: ‘बिग बॉस मराठी’चे पाचवे पर्व सुरू आहे. हा शो सुरू होऊन दोन आठवडे झाले आहेत. शोचा पहिला आठवडा घरात सर्वांशी वाद घालून निक्की तांबोळीने गाजवला, तर दुसऱ्या आठवड्यात जान्हवी किल्लेकरची घरातील सदस्यांशी भांडणं झाल्याचं पाहायला मिळालं.

जान्हवीने वर्षा उसगांवकर, अभिजीत सावंत, आर्या जाधवशी यांच्याशी कडाक्याची भांडणं केली. एका भांडणात जान्हवी अभिजीतला बांगड्या घाल असं म्हणाली होती. तिच्या त्याच वक्तव्यावरून ‘भाऊचा धक्का’ मध्ये होस्ट रितेश देशमुखने तिला खडे बोल सुनावले. इतकंच नाही तर संतापलेल्या रितेशने जान्हवीला घरातून बाहेर काढण्याचंही वक्तव्य केलं. ‘बिग बॉस मराठी’चा हा नवीन प्रोमो चांगलाच चर्चेत आहे.

Video: “त्याला गेम नाही, पण माणसं कळली,” सुरज चव्हाणला केर काढताना पाहून उत्कर्ष शिंदे म्हणाला, “शिक्षण नसूनही कधी…”

व्हिडीओमध्ये रितेश रागात जान्हवीला सुनावताना दिसतो. “जान्हवी अभिजीतला तुम्ही म्हणालात बांगड्या घाल. बांगड्या घाल म्हणजे काय? बांगड्या म्हणजे शक्तीचं प्रतीक असलं पाहिजे. याच बांगड्या घालणाऱ्या स्त्रिया फक्त घर नाही, तर देश सांभाळतात. मी बाकीच्यांना बाहेर काढेन की नाही माहीत नाही. पण तुम्हाला नक्की काढेन,” असं म्हणत रितेशने जान्हवी किल्लेकरचा समाचार घेतला.

“ही आगाऊ कार्टी जान्हवी…”, मेघा धाडेची संतप्त पोस्ट! सलमान खानचा उल्लेख करत रितेशला केली ‘अशी’ विनंती, म्हणाली…

रितेश देशमुखने जान्हवी किल्लेकरच्या वागण्यावरून तिला चांगलंच सुनावलं. यानंतर जान्हवी रडताना दिसून आली. आठवडाभर जान्हवी घरातील सदस्यांना नको नको ते बोलत होती, त्यामुळे शो पाहणारे प्रेक्षकही नाराजी व्यक्त करत होते. अशातच आता रितेशने संताप व्यक्त करत तिला घरातून बाहेर काढणार असल्याचं वक्तव्य केलं. आजच्या ‘भाऊचा धक्का’ मध्ये रितेश आणखी कोणाला सुनावणार व कोणाचं कौतुक करणार ते लवकरच कळेल.

 Bigg Boss Marathi : “मी तर अनाथ मुलगीच बायको करणार”, घरच्यांच्या आठवणीत सुरज चव्हाणने केलं वक्तव्य

जान्हवी किल्लेकरचं वर्षा उसगांवकरांशी भांडण

जान्हवीने गार्डन परिसरात वर्षा उसगांवकरांबरोबर भांडण केलं. “ही फालतूची ओव्हरअ‍ॅक्टिंग नका करू… त्यांना आता पश्चाताप होत असेल यांना आपण पुरस्कार का दिले? कारण, बाहेर अनेक चांगले-चांगले अभिनेते आहेत. त्यांना पुरस्कार मिळाले नाहीत…पण, तुम्हाला दिलाय,” असं ती या भांडणात म्हणाली. जान्हवीच्या या वक्तव्यावर सध्या खूप टीका होत आहे.

Bigg Boss Marathi : “ताई ही घाणेरडी अ‍ॅक्टिंग…”, जान्हवीकडून वर्षा उसगांवकरांचा अपमान; नेटकरी संतप्त होत म्हणाले, “लाज वाटली पाहिजे…”

‘बिग बॉस मराठी’ हा शो दररोज रात्री ९ वाजता कलर्स मराठीवर प्रसारित होतो. तसेच तुम्ही जिओ सिनेमावरही हा शो पाहू शकता.