scorecardresearch

Premium

पाच वर्षांच्या संसारानंतर प्रसिद्ध सेलिब्रिटी जोडपं होणार आई-बाबा; समुद्रकिनारी केलेलं फोटोशूट चर्चेत

Rochelle Rao announces pregnancy : अफेअर, पाच वर्षांचा संसार अन् सेलिब्रिटी जोडप्याने दिली गुड न्यूज

rochelle rao shares her baby bump photoshoot pictures keith sequeira announces pregnancy
किथ सिक्वेरा आणि रोशेल राव (फोटो – इन्स्टाग्रामवरून साभार)

अभिनेता किथ सिक्वेरा आणि अभिनेत्री रोशेल राव लवकरच आई-बाबा होणार आहेत. बुधवारी या दोघांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. ते त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत करण्यास तयार असल्याचं त्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करत सागितलं. दोघांनी चाहत्यांना गुड न्यूज देताना समुद्रकिनाऱ्यावर काढलेले सुंदर फोटोही शेअर केले.

अनुभव: लग्नासाठी मुलगा शोधताना…

A farewell ceremony was held for a 66 year old female elephant
Video : गोमतीचा निरोप समारंभ! आयएफएस अधिकाऱ्याची कौतुकाची पोस्ट
Sycamore_Gap
इंग्लंडमधील ३०० वर्षांचे ‘सिकामोअर गॅप’ झाड तोडले, या झाडाला एवढे महत्त्व का?
Air India Passenger Burns As Crew Spill Hot Water on Leg Angry Post Saying My 4 Year Son Heard Cut Scissors Mental shock
Air India च्या क्रूमुळे प्रवाशाला सेकंड डिग्री बर्न! संतप्त पोस्ट चर्चेत, म्हणाल्या “दोन तास कळवळताना, ४ वर्षांचा मुलगा..”
jawan-shahrukh2
१००० कोटी कमावण्याबद्दल शाहरुखने केलेली १० वर्षांपूर्वीच भविष्यवाणी; किंग खानचा ‘तो’ व्हिडीओ चर्चेत

फोटोशूटमध्ये रोशेलने फिकट गुलाबी रंगाचा ड्रेस घातला आहे, तर किथनेही मॅचिंग शर्ट आणि पांढरी पँट घातली आहे. पहिल्या फोटोत तो रोशेलच्या बेबी बंपवर कान ठेऊन समुद्राजवळ पोज देताना दिसत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये किथ पत्नी रोशेलच्या कपाळावर किस करताना दिसत आहे.

‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेतील अंजीला वाढदिवशी बॉयफ्रेंडने केलं प्रपोज, अभिनेत्री व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

या जोडप्याने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर फोटो पोस्ट केले आणि त्याला कॅप्शन दिले, “दोन लहान हात, दोन लहान पाय, एक लहान मुलगा किंवा मुलगी ज्याला भेटण्यासाठी आम्ही वाट पाहू शकत नाही! होय, तुमचा अंदाज बरोबर आहे, आम्ही पालक होणार आहोत! या अविश्वसनीय भेटीसाठी प्रभू येशूंचे आणि तुम्ही दिलेल्या प्रेमासाठी तुम्हा सर्वांचे आभार. या नवीन प्रवासात आम्हाला आशीर्वाद द्या आणि आमच्यासाठी प्रार्थना करत राहा”.

ही आनंदाची बातमी दिल्यानंतर किथ व रोशेलवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. किथ सिक्वेरा आणि रोशेल राव यांनी २०१८ मध्ये तामिळनाडूच्या महाबलीपुरममध्ये एका खासगी समारंभात लग्न केले होते. त्यापर्वी काही वर्षे ते एकमेकांना डेट करत होते. त्यांनी एकत्र २०१५ मध्ये ‘बिग बॉस ९’ आणि २०१९ मध्ये ‘नच बलिए’मध्ये भाग घेतला होता.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rochelle rao keith sequeira announces pregnancy shares baby bump photoshoot pictures hrc

First published on: 03-08-2023 at 12:35 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×