तरुणाईत प्रचंड लोकप्रिय असलेल्या 'रोडीज' शोच्या १९ व्या सीझनला सुरुवात झाली आहे. मुलं आपल्या आई-वडिलांबरोबर सर्वात आनंदी असतात, परंतु सगळ्यांच्या बाबतीत असे होत नाही. 'रोडीज' ऑडिशनच्या पर्सनल राऊंडमध्ये एका तरुणीने वडिलांच्या मृत्यूसाठी प्रार्थना केल्याबद्दल खुलासा केला आहे. सध्या शोच्या निर्मात्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेला हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे. हेही वाचा : शाहरुख नव्हे तर ‘हा’ बॉलीवूड अभिनेता करणार आर्यन खानच्या ‘स्टारडम’ सीरिजमध्ये कॅमिओ लेखा जांबौलीकर या रोडीज स्पर्धक तरुणीने ऑडिशनच्या पर्सनल राऊंडमध्ये धक्कादायक खुलासा केला आहे. MTV ने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये गॅंग लीडर प्रिन्स नरुलाने "लेखाला तू वडिलांच्या मृत्यूसाठी प्रार्थना केली याचा अर्थ काय याबाबत विचारले?" यावर स्पर्धक लेखा म्हणाली, "मला लहानपणापासून असा एकही दिवस आठवत नाही, ज्यादिवशी माझे वडील दारू पिऊन घरी आले नाहीत. दारू पिऊन ते माझ्याशी आणि आईशी गैरवर्तन करायचे त्यांच्यापासून वाचण्यासाठी मी, 'मला मरण येऊ दे' किंवा 'त्यांचा मृत्यू होऊ दे' अशी प्रार्थना केली होती." हेही वाचा : लाहोरची संस्कृती, इस्लाम धर्माचा अभ्यास…” ‘गदर’चित्रपटासाठी अमीषा पटेलने घेतली होती प्रचंड मेहनत; म्हणाली… गॅंग लीडर रिया चक्रवर्तीने लेखाला, "वडिलांवर तू हात उचलला होतास का?" असा प्रश्न केला. यावर ती म्हणाली, "माझे वडील आईला मारायचे ते मी पाहू शकत नव्हते. म्हणून एकदा आईच्या रक्षणासाठी मी त्यांच्यावर हात उचलला होता. माझ्या पगारातील एक रुपयाही तुम्हाला देणार नाही असे मी त्यांना आधीच सांगितले होते आणि ज्यादिवशी मला पहिल्या पगाराचा चेक मिळाला तेव्हाच त्यांचे निधन झाले." लेखाने केलेला धक्कादायक खुलासा ऐकून सगळेच गॅंग लीडर्स निशब्द झाल्याचे पाहायला मिळाले. https://www.instagram.com/reel/CtEDrtEJlLS/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA== दरम्यान, रोडीजच्या नव्या पर्वाला ३ जूनपासून सुरुवात झाली असून, हा कार्यक्रम दर शनिवार आणि रविवारी संध्याकाळी ७ वाजता एमटीव्हीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.