लोकप्रिय हिंदी मालिका ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या मालिकेतून अचानक दोन कलाकारांना डच्चू देण्यात आला. दोघांच्या अनफ्रोफेशनल वागण्यामुळे त्यांना मालिकेतून काढल्याचं स्पष्टीकरण निर्मात्यांनी दिलं. शहजादा धामी व प्रतीक्षा होनमुखे अशी त्यांची नावं असून ते रुही व अरमान या भूमिका करत होते.

प्रतीक्षा व शहजादा यांचं अफेअर होतं आणि ते जास्तीत जास्त वेळ एकमेकांच्या मेकअप रुममध्ये घालवायचे. त्यामुळे शूटिंगला उशीर व्हायचा. इतकंच नाही तर दोघांचे खूप नखरे होते, ज्यामुळे निर्माते वैतागले होते. अखेर एकेदिवशी त्यांना शोमधून काढून टाकलं आणि त्यांची जागा नव्या कलाकारांनी घेतली. पण आता नव्या कलाकारांकडून निर्मात्यांनी ‘नो अफेअर क्लॉज’ वर सही करून घेतली आहे.

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ तील दोन मुख्य कलाकारांना निर्मात्यांनी दाखवला बाहेरचा रस्ता, ‘हे’ आहे कारण

रोहित पुरोहितने शहजादा धामीची जागा घेतली. रोहितने ‘नो अफेअर क्लॉज’ची पुष्टी केली आहे. “मी याबाबत ऐकलं आहे आणि याचा माझ्या करारातही समावेश आहे. पण याला किती यश येईल ते सांगता येत नाही, कारण कोणी ठरवून प्रेमात पडत नाही. तुम्ही त्या गोष्टी थांबवू शकत नाही. या कायदेशीर गोष्टी आहेत, पण कलाकारांनी कामाबद्दल प्रोफेशनल असायला हवं,” असं रोहित म्हणाला.

शहजादा व प्रतीक्षाच्या अफेअरबाबत विचारल्यावर रोहित म्हणाला की त्याने मीडिया व सेटवरील लोकांना याबाबत बोलताना ऐकलं आहे. निर्माते राजन शाहींनी एवढा मोठा निर्णय घेतला म्हणजे काहीतरी नक्कीच मोठं घडलं असावं, असंही त्याने नमूद केलं. रोहितने सांगितलं की मालिकेत घेताना राजन शाहींनी ही मालिका नाही तर माझी मुलगी तुला देतोय, असं समज असं म्हटलं होतं.

‘पक पक पकाक’ मधली ‘साळू’ सध्या काय करते, कशी दिसते? जाणून घ्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेचे निर्माते राजन शाही यांनी नुकतीच अरमानची भूमिका साकारणाऱ्या शहजादा धामी आणि रुहीची भूमिका साकारणाऱ्या प्रतीक्षा होनमुखे यांना मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवला. त्यांची जागा आता रोहित पुरोहित आणि गर्विता साधवानी यांनी घेतली आहे.