‘झी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’चं पहिलं पर्व चांगलंच गाजलं होतं. या पर्वातील लिटिल चॅम्प्सने आपल्या गोड आवाजाने श्रोत्यांच्या मनात कायमचं स्थान निर्माण केलं आहे. विशेष म्हणजे पहिल्या पर्वातील पंचरत्नांना श्रोत्यांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. त्यावेळी या पंचरत्नांच्या गाण्यांच्या कॅसेट मोठ्या प्रमाणात विकल्या गेल्या होत्या. अजूनही या पंचरत्नांवर श्रोते तितकेच प्रेम करताना दिसत आहेत. सध्या पंचरत्नांपैकी एक म्हणजे रोहित राऊतचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये रोहित राऊतने पहिल्यांदाच तमिळ गाणं गायलं आहे. दाक्षिणात्य सुप्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थच्या ‘चिट्ठा’ चित्रपटातील ‘उनक्कु थाण’ (Unakku Thaan) गाणं रोहितने आपल्या सुमधूर आवाजात गायलं आहे. रोहितचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नेटकरी त्याचं कौतुक करत आहेत.

हेही वाचा – Video: ‘देखा तेनु पहली पहली बार…”, नारकर जोडप्याचा रोमँटिक गाण्यावर जबरदस्त डान्स, अविनाश यांच्या एक्सप्रेशन्सने वेधलं लक्ष

हेही वाचा – ‘शुभविवाह’ मालिकेतून अचानक ‘या’ अभिनेत्याची एक्झिट, आता ‘लग्नाची बेडी’ फेम अभिनेता झळकला ‘या’ भूमिकेत

रोहित राऊतच्या या व्हिडीओवर कलाकार मंडळींसह नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. “तेलुगू गाणं गाण्याचाही प्रयत्न कर”, “कोण म्हणेल का मराठी गायक आहे म्हणून”, “काहीही समजलं नाही…पण तुझं गाणं छान आहे”, “तोडलंस मित्रा”, “एकदम कडक”, “एकच नंबर”, “नेक्स्ट अरिजित सिंह”, “मस्त”, “उत्कृष्ट…उत्तम प्रयत्न”, “रोहित तुझा आवाज खूपच छान आहे. मी तुझी सारेगमपपासून चाहती आहे”, अशा अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी रोहितच्या व्हिडीओवर दिल्या आहेत.

हेही वाचा – Video: ‘नवरी मिळे हिटलरला’मधील कलाकारांचा गोविंदाच्या गाण्यावरील जबरदस्त डान्स, वल्लरी विराज म्हणाली, “वेडसर…”

दरम्यान, रोहित राऊतच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्याने ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर नुकत्याच सुरू झालेल्या ‘अंतरपाट’ नव्या मालिकेचं शीर्षकगीत गायलं आहे. सावनी रविंद्रबरोबर त्यानं हे मालिकेचं शीर्षकगीत गायलं आहे. याशिवाय रोहित राऊतने गायलेलं ‘नखरेवाली’ हे गाणं अजूनही ट्रेंड होतं आहे. या गाण्याला मिलियनमध्ये व्ह्यूज मिळाले असून सोशल मीडियावर अनेकजण अजूनही या गाण्यावर रील करताना दिसत आहेत.