अभिनेत्री रुबिना दिलैक सध्या चांगलीच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच रूबिनाने गरोदर असल्याची घोषणा केली होती. गेल्या काही दिवसांपासून रुबिना गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. आता रुबिनाने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत आई बनणार असल्याचे जाहीर केले आहे.
दरम्यान रुबिनाने नुकतीच इन्स्टाग्रावर आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये रुबिनाने आपल्या बेबी बंपचे फोटो शेअर केले आहेत. हा फोटो शेअर करत रुबिनाने लिहिलं आहे ‘ममाकाडो’. रुबिनाच्या या फोटोवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत. अनेकांनी कमेटं करत तिचं अभिनंदन केलं आहे.
रुबिनाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर अनेक हिंदी मालिकांमध्ये रुबिनाने काम केलं आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर रुबिनाने वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘छोटी बहू’ या मालिकेमुळे तिला खरी ओळख मिळाली. हिंदी बिग बॉसमध्येही रुबिनाने सहभाग घेतला होता. त्याचबरोबर ती शक्ती’ आणि ‘झलक दिखला जा’ या कार्यक्रमातही झळकली.
रुबिनाने अभिनेता अभिनव शुक्लाबरोबर २०१८ मध्ये लग्नगाठ बांधली. मध्यंतरी दोघांच्या घटस्फोटाच्या अफवाही ऐकायला मिळाल्या होत्या. बिग बॉस १४ मध्ये दोघांनी सहभाग घेतला होता. यादरम्यान दोघांच्या नात्याततला दूरावा कमी झाला आणि दोघे जवळ आल्याचं पहायला मिळालं होतं.