“तो मला एकटीला…” रुपाली भोसलेने ‘त्याच्यासाठी’ केलेली पोस्ट चर्चेत

तिने तिच्या प्रेमाबद्दल केलेल्या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

rupali bhosle
रुपाली भोसले

छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्रावर प्रेक्षक भरभरून प्रेम करताना दिसतात. या मालिकेत संजना ही भूमिका साकारणारी अभिनेत्री रूपाली भोसले हिलाही प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. ती या मालिकेत नकारात्मक भूमिका जरी साकारत असली तरी तिने तिच्या कामाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. तिचा चाहता वर्ग खूप मोठा आहे आणि सोशल मीडियावरही ती सक्रिय राहून तिच्या आयुष्याबद्दलचे महत्त्वाचे अपडेट्स चाहत्यांशी शेअर करत असते. आता तिने नुकतीच प्रेमाबद्दल एक पोस्ट केली आहे.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

रूपाली नेहमीच तिच्या कामाबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्यमुळे ही चर्चेत असते. आजूबाजूला घडत असणाऱ्या तिला पटणाऱ्या किंवा न पटणाऱ्या गोष्टी ती सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्टपणे मांडताना दिसते. अशातच तिने तिच्या प्रेमाबद्दल केलेल्या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

आणखी वाचा : प्रसाद जवादेला अभिनय नाही तर ‘या’ क्षेत्रात करायचं होतं करिअर, स्वतःच्या मृत्यूचा उल्लेख करत म्हणाला…

तिचं हे अतूट नातं आहे ती कोणीही व्यक्ती नसून ते आहे ट्रॅफिक. तिने सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडिओ शेअर केला. यावेळी ती गाडीतून प्रवास करत असून तिच्या गाडीच्या पुढे वाहनांची मोठीच्या मोठी रांग लागलेली दिसत आहे. या व्हिडिओत जरी ते वैतागलेली दिसत असली तरी कॅप्शनमध्ये मात्र तिने तिच्या ट्रॅफिकशी असलेल्या प्रेमाच्या नात्यावर भाष्य केलं आहे.

हेही वाचा : Video: बॉलिवूड पदार्पणाचा आनंद गगनात मावेना, बार काउंटरवर चढून बेभान होऊन नाचली ‘ही’ मराठी अभिनेत्री

ट्राफिकमध्ये अडकलेल्या रूपालीने ‘मान मेरी जान’ या गाण्यावर एक्सप्रेशन्स देत ती अत्यंत वैतागलेली असल्याचं दाखवलं आहे. हा व्हिडिओ शेअर करत तिने लिहिलं, “ट्रॅफिक आणि मी मेड फॉर इच अदर आहोत. मला रोज शूटिंग सेटवर पोहोचायला फक्त ७ मिनिटं लागतात. प्रवासात वेळ जाऊ नये म्हणून मी ठाण्याला शिफ्ट झाले. मला वाटलं यामुळे मला स्वत:ला वेळ देता येईल. पण ट्रॅफिकचं माझ्यावर खुपच प्रेम आहे. तो मला एकटीला सोडतच नाही. ७ मिनिटाच्या अंतरावर जायला आज १ तास लागला. आपण टाईम इज मनी म्हणतो हे चुकीचं आहे…तुम्हालाही असंच वाटतं का?” तिचा हा व्हिडिओ चाहतांना आवडला असून चाहते यावर भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 14-12-2022 at 14:44 IST
Next Story
“…तेव्हा मला आईने झाडूने मारलं होतं” प्राजक्ता माळीने सांगितला ‘तो’ किस्सा
Exit mobile version