Premium

नेमप्लेटवर आई-बाबांचं नाव, लंडनची थीम अन्…; ‘असं’ सजवलं ऋतुजा बागवेने नवीन घर; म्हणाली…

अभिनेत्री ऋतुजा बागवेने कसं सजवलं नवीन घर? खुलासा करत म्हणाली…

rutuja bagwe decorated her new home as per london theme
ऋतुजा बागवेचं नवीन घर ( फोटो : इन्स्टाग्राम )

अभिनेत्री ऋतुजा बागवेने अलीकडेच ठाण्यात हक्काचं नवीन घर खरेदी केलं. तिच्या नव्या घराचे फोटो सोशल मीडियावर बरेच व्हायरल झाले आहेत. अभिनेत्रीच्या घरातील साध्या, सुंदर पण हटके अशा सजावटीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिने ही सजावट कशी केली, घर सजवण्यापूर्वी ऋतुजाने काय विचार केला होता? याबद्दल तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : ऋतुजा बागवेने सांगितलं मुंबईपासून लांब घर घेण्याचं कारण; म्हणाली, “कॉंक्रिटचं जंगल…”

अभिनेत्री ऋतुजा बागवे इट्स मज्जाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली, “हे घर एका कलाकाराचं आहे ही गोष्ट घराच्या प्रवेशद्वारावरच लोकांना कळाली पाहिजे हा विचार मी आधीच केला होता. काहीतरी वेगळं हवं हे कायम डोक्यात होतं. अशातच मी ‘लंडन मिसळ’ नावाचा एक चित्रपट केला. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मला लंडन शहर फार आवडलं. त्यामुळे तेथे असणाऱ्या घरांची थीम, तेथील घरांच्या रंगांची झलक तुम्हाला माझ्याही घरात पाहायला मिळेल. माझ्या घराचा हिरव्या रंगाचा दरवाजा मी लंडनमध्ये पाहिला होता. ‘लंडन मिसळ’च्या शूटिंगवेळी मी तेथील घराचा फोटो काढून ठेवला होता. त्याप्रमाणे मग इथे येऊन मी डिझायनरला माझ्या डोक्यातील कल्पना सांगितली.”

हेही वाचा : कंगना रणौतच्या ‘चंद्रमुखी २’साठी मराठमोळ्या आर्या आंबेकरने गायलं आहे खास गाणं; गायिकेची पोस्ट चर्चेत

ऋतुजा बागवे पुढे म्हणाली, “घराच्या सजावटीसाठी लागणारी छोट्यातील छोटी गोष्ट सुद्धा मी स्वत: जाऊन विकत घेतली आहे. माझा पूर्णवेळ मी घर सजवण्यासाठी दिला होता. माझ्या घराच्या नेमप्लेटवर ३ फुलं आहेत. मला निसर्गाबद्दल खूप प्रेम आहे त्यामुळे ती नेमप्लेट मला पाहताक्षणी आवडली. आई-बाबा आणि माझं अशी तीन नावं नेमप्लेटवर असल्यामुळे त्याला जोडून तीन फुलं असावी असं माझ्या डोक्यात सुरु होतं. त्याप्रमाणे मी एका आर्टिस्टकडून नेमप्लेट तयार करून घेतली.”

हेही वाचा : “घर घेतल्यावर आता त्याचा EMI…,” ऋतुजा बागवेचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली…

“आई-बाबांचा खंबीरपणे पाठिंबा असल्याने मी घर घेण्याचा निर्णय घेतला. त्या दोघांमुळे आज कर्ज आणि EMI चं एवढं टेन्शन वाटत नाहीये. हे नवीन घर त्या दोघांचं आहे मी फक्त हे घर सांभाळणार आहे.” असं ऋतुजाने सांगितलं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rutuja bagwe decorated her new home as per london theme see her unique nameplate sva 00

First published on: 02-10-2023 at 10:24 IST
Next Story
कोकणची शान नेहा पाटीलला मिळाला लावणी सम्राज्ञीचा मान; ठरली ‘ढोलकीच्या तालावर’ची विजेती