scorecardresearch

Premium

ऋतुजा बागवेने सांगितलं मुंबईपासून लांब घर घेण्याचं कारण; म्हणाली, “कॉंक्रिटचं जंगल…”

“…म्हणून मुंबईपासून दूर घर घेतलं”, अभिनेत्री ऋतुजा बागवेने सांगितलं कारण

rutuja bagwe new home in thane
अभिनेत्री ऋतुजा बागवेने घेतलं नवीन घर

अभिनेत्री ऋतुजा बागवे छोट्या पडद्यावरील ‘नांदा सौख्यभरे’ या मालिकेमुळे घराघरांत लोकप्रिय झाली. आजवर तिने नाटक, चित्रपट, मालिका अशा तिन्ही क्षेत्रांमध्ये काम केलं आहे. अलीकडेच ऋतुजाने ठाण्यात तिचं स्वप्नातील घर खरेदी केलं. तिच्या आई-बाबांचं घर परळमध्ये आहे. त्यामुळे मुंबईपासून लांब घर घेण्याचं नेमकं कारण काय आहे? याचा खुलासा अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत केला आहे.

हेही वाचा : कंगना रणौतच्या ‘चंद्रमुखी २’साठी मराठमोळ्या आर्या आंबेकरने गायलं आहे खास गाणं; गायिकेची पोस्ट चर्चेत

tu chal pudha fame actress dhanashree kadgaonkar
“प्रसूतीनंतर काम कसं सांभाळलंस?”, ‘तू चाल पुढं’ फेम अभिनेत्रीने एका शब्दात दिलं उत्तर…
marathi actor suvrat joshi shared post on instagram
“२१ व्या शतकात दिल्लीत…”, सुव्रत जोशीने सांगितला लहान मुलांबद्दलचा प्रसंग; संतप्त पोस्ट करत म्हणाला, “लज्जास्पद…”
Uma-tips-for-pimple-free-skin
चेहरा नितळ आणि पिंपल फ्री कसा ठेवायचा? सोप्या घरगुती टिप्स देत लोकप्रिय मराठी अभिनेत्री म्हणाली…
Gutami sai mrunmayi
गौतमी देशपांडे ‘या’ लोकप्रिय अभिनेत्याला करतेय डेट? सई ताम्हणकरच्या कमेंटवर उत्तर देत मृण्मयी म्हणाली…

ऋतुजाने तिच्या नव्या घराचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सगळ्या फोटोंमध्ये तिच्या घरातील खिडकीतून दिसणाऱ्या निसर्ग सौंदर्याने विशेष लक्ष वेधून घेतलं आहे. याविषयी इट्स मज्जाला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, “माझ्या मित्र-मैत्रिणींचा गोतावळा ठाण्यात राहतो आणि मी प्रचंड निसर्गप्रेमी आहे. सगळ्यात आधी आईच्या सांगण्यावरून मी नवं घर शोधायला सुरुवात केली होती. पहिल्या दिवसापासून निसर्गाच्या सानिध्यात घर घ्यायचं हे मी ठरवलं होतं.”

हेही वाचा : प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारने फुटपाथवरून चालणाऱ्या जोडप्याला दिली धडक; महिलेचा मृत्यू, पतीची प्रकृती चिंताजनक

ऋतुजा पुढे सांगते, “कॉंक्रिटचं जंगल मला अजिबात आवडत नाही. माझा स्वभाव खूप शांत आहे त्यामुळे मला शांत ठिकाणी राहायला आवडतं. त्यामुळे बघता क्षणी ही जागा मला आवडली. माझे बरेच मित्र-मैत्रिणी या भागात राहत असल्याने हा परिसर मला आधीपासून आवडायचा. इथे याआधी सुद्धा येणं-जाणं व्हायचं. माझ्या आई-बाबांच्या घराची म्हणजे परळची गच्ची मला खूप आवडते. पण, या घरातून मला निसर्ग जास्त अनुभवायला मिळाला. ही जागा शांत आहे आणि सगळ्यांपासून लांब राहायला कधीकधी मला खूप आवडतं.”

हेही वाचा : “लग्न करण्याअगोदर…” ‘दिल दोस्ती दुनियादारी फेम’ सुव्रतने सांगितला लिव्ह इन रिलेशनशिपचा अनुभव, म्हणाला, “त्या व्यक्तीबरोबर…”

“आता आई-बाबा इथे आल्यावर त्यांनाही निसर्गाच्या सानिध्यात वीकेंडचा मस्त फिल येईल. या घरात एक मोठी खिडकी आहे आणि तिकडून एक सुंदर डोंगर दिसतो. इथून पाऊस उत्तम दिसतो, वारा छान वाहतो, कधी कधी धुकं दिसतं आणि कधीतरी दूरवर ठाणे शहराची झलक पाहायला मिळते. घरी जे लोकं येतात त्यांची सगळ्यांची नजर पहिली खिडकीकडे जाते. त्यामुळे मी जेव्हा ही वास्तू पाहिली तेव्हाचं मला वाटलं यही है मेरा घर” असं ऋतुजाने सांगितलं.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rutuja bagwe reveals why she bought new house in thane and not in mumbai sva 00

First published on: 01-10-2023 at 19:32 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×