काही दिवसांपूर्वी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर अनेक मराठी कलाकारांनी साखरपुडा उरकला. तसेच काहींनी लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. यापैकी एक म्हणजे ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेतला श्रीनू म्हणजेच अभिनेता अभिषेक गावकर. अभिषेकचा ९ एप्रिलला मोठ्या थाटामाटात साखरपुडा पार पडला. साखरपुड्याचा पहिला व्हिडीओ नुकताच समोर आला आहे.

अभिनेता अभिषेक गावकरचा सोशल मीडिया स्टार सोनाली गुरव हिच्याबरोबर साखरपुडा झाला. बरेच वर्ष दोघं एकमेकांना डेट करत होते. अखेर ९ एप्रिलला दोघांचा साखरपुडा झाला. साखरपुड्याचा पहिला व्हिडिओ अभिषेकची होणारी बायको सोनालीने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

हेही वाचा – संजय मोने-सुकन्या मोने का करत नाहीत एकत्र काम? जाणून घ्या…

या व्हिडीओत, साखरपुड्यातील विधीसह धमाल-मस्ती पाहायला मिळत आहे. तसेच अभिषेकसह दोघांच्या मित्र-मैत्रींणीचा जबरदस्त डान्स परफॉर्मन्स देखील पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे साखरपुड्यातील दोघांचा लूक हा लक्षवेधी ठरला.

अभिषेक व सोनालीच्या साखरपुड्याच्या व्हिडीओवर अनेक कलाकारांसह चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेत्री रेश्मा शिंदे, सुरुची अडारकर, साक्षी गांधी आणि बऱ्याच लोकप्रिय सोशल मीडिया स्टारने साखरपुड्याच्या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिषेक व सोनालीच्या साखरपुड्याचा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.

हेही वाचा –Video: ‘अबोली’मधील दमदार भूमिकेनंतर सुयश टिळक येतोय नव्या रुपात नव्या मालिकेत, सोबतीला असणार ‘देवयानी’मधील ‘हा’ अभिनेता

दरम्यान, अभिषेकच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तो ‘सारं काही तिच्यासाठी’ या मालिकेपूर्वी बऱ्याच मालिकांमध्ये विविध भूमिकेत पाहायला मिळाला होता. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या लोकप्रिय मालिकेत झळकला होता. तसंच ‘सन मराठी’वर ‘माझी माणसं’ या मालिकेतही तो पाहायला मिळाला. अभिषेकची ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेतील भूमिका गाजली होती. अभिषेक प्रमाणे त्याची होणारी बायको सोनालीचा मोठा चाहता वर्ग आहे. तिचे सोशल मीडियावर ३ लाख १३ हजारांहून अधिक फॉलोवर्स आहेत.