‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे आहे. २०२२ मध्ये ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. गेली जवळपास दीड वर्षे ही मालिका चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या मालिकेतील कलाकार आपल्या अभिनयाने जसं प्रेक्षकांना खिळवून ठेवतात तशाच प्रकारे ऑफ स्क्रिन हे कलाकार मजा मस्ती आणि धमाल करताना दिसतात.

मालिकेतील नायिका नेत्रा म्हणजेच तितीक्षा तावडे अभिनयासह आपल्या वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टीही चाहत्यांबरोबर शेअर करत असते. नुकताच सोशल मीडियावर तिने एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. एका हिंदी मालिकेतील डायलॉगवर या मालिकेतील कलाकारांनी मजेशीर अभिनय केला आहे. तितीक्षा तावडे, ऐश्वर्या नारकर, अमृता रावराणे, एकता यांनी हा हास्यास्पद अभिनय केला आहे.

हेही वाचा… “यापुढे मी महाराजांची भूमिका करणार नाही”, मुलाच्या नावाने होणाऱ्या ट्रोलिंगबद्दल चिन्मय मांडलेकर स्पष्टच म्हणाला…

या व्हिडीओत ऐश्वर्या नारकर खलनायिकेच्या भूमिकेत दाखवल्या आहेत. यात ऐश्वर्या नारकर तितीक्षाला म्हणतात “मनी, काय करतेस?” यावर तितीक्षा उत्तर देत म्हणते, “भाजी बनवते आहे.” नंतर ऐश्वर्या नारकर यांचा राग अनावर होतो आणि त्या तितीक्षाला ओरडून म्हणतात, “भाजी नाही बनणार, पोहे बनतील.” या व्हिडीओदरम्यान जे बॅकग्राउंड म्यूझिक वाजत यावर कलाकार ऐश्वर्या नारकर, अमृता आणि एकता विनोदी नृत्य करताना दिसतायत.

मालिकेतील या कलाकारांचा हा मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओवर अनेक चाहत्यांच्या प्रतिक्रियादेखील आल्या आहेत. “मालिकेपेक्षा हेच बघायला भारी आहे” अशी एका युजरने कमेंट केली. “एकापेक्षा एक नमुने आहात तुम्ही सगळे” अशी कमेंट दुसऱ्याने केली. “झाले का तयार मग पोहे” असं तिसऱ्याने विचारलं. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “वेडे आहात तुम्ही.”

हेही वाचा… ‘चला हवा येऊ द्या’नंतर भाऊ कदम यांनी नाकारली होती हिंदी कॉमेडी शोची ऑफर; किस्सा सांगत म्हणाले, “आपल्याला मराठीत जेवढा मान…”

“या पोहे खायला” असं कॅप्शन तितीक्षाने या व्हिडीओला दिलंय.

दरम्यान, ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेमध्ये तितीक्षा तावडे नायिकेची भूमिका साकारत आहे; तर ऐश्वर्या नारकर या खलनायिकेच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळतायत. त्याव्यतिरिक्त या मालिकेत अजिंक्य ननावरे, श्वेता मेहेंदळे, राहुल मेहेंदळे, जयंत घाटे यांच्याही निर्णायक भूमिका आहेत.