मराठी मनोरंजन सृष्टीतील एव्हरग्रीन जोड्यांपैकी एक जोडी म्हणजे सचिन पिळगावकर व सुप्रिया पिळगावकर. गेली अनेक वर्ष ते आपल्या कामाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. ८०-९० च्या दशकांत सचिन व सुप्रिया यांनी एकत्र मिळून अनेक चित्रपट केले. या दोघांवर चित्रित झालेली अनेक गाणीही खूप गाजली. पण गेल्या काही वर्षांत सचिन व सुप्रिया पिळगावकर एकत्र डान्स करताना दिसले नव्हते. आता अखेर ही प्रतीक्षा संपली आहे.

सध्या सर्वत्र ‘झी चित्र गौरव पुरस्कार’ सोहळ्याची चर्चा आहे. यंदाचा हा पुरस्कार सोहळा खूप खास असणार आहे. याचं कारण म्हणजे अनेक वर्षांनी सचिन पिळगावकर व सुप्रिया पिळगावकर एकत्र डान्स करताना दिसणार आहेत. त्यांच्याच सुपरहिट झालेल्या गाण्यांवर ती दोघं नृत्य सादर करताना दिसतील.

Who is Trishla Chaturvedi
“आमच्यासमोर नॉनव्हेज बिर्याणी ऑर्डर केली म्हणून ४५ दिवस गोमूत्र-शेण खाल्लं”, हा दावा करणाऱ्या त्रिशला चतुर्वेदी कोण आहेत?
Hockey player Sukhjit eager for strong performance in Olympics
स्वप्नवत पदार्पणाचे लक्ष्य; ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरीसाठी हॉकीपटू सुखजित उत्सुक
zoologist Adam Britton
Adam Britton : प्राणीशास्त्रज्ञ ॲडम ब्रिटन यांचा श्वानावर बलात्कार, ४० श्वानांची हत्या; आता मिळाली २४९ वर्षांची शिक्षा
Tripura hiv positive cases rising
‘एचआयव्ही’मुळे ४७ विद्यार्थ्यांचा मृत्यू, ८०० हून अधिक संक्रमित; त्रिपुरा कसे ठरत आहे ‘एचआयव्ही’चे हॉटस्पॉट?
Sunil Gavaskar 75th Birthday Special boundary hero who allowed the Laxman Line to cross
‘लक्ष्मणरेषा’ पार करू देणारा बाउंड्रीवीर…
MS Dhoni New Haircut Photos Viral
माहीच्या नव्या ‘हेअर स्टाइल’ने वेधले सर्वांचे लक्ष; व्हायरल फोटो पाहून चाहते म्हणाले, ‘काही दिवसात तो ४३ वर्षांचा होईल यावर…’
prince narula yuvika chaudhary announced pregnancy
७ वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीसह थाटला संसार, सहा वर्षांनी बाबा होणार प्रिन्स नरुला; पोस्ट करत दिली आनंदाची बातमी
what is Lavender marriage
‘लॅव्हेंडर मॅरेज’ म्हणजे काय? LGBTQ समुदायाला इच्छा नसताना का करावे लागते लॅव्हेंडर मॅरेज?

आणखी वाचा : Video: …अन् श्रीवल्ली मराठीत बोलू लागली, रश्मिका मंदानाचा मराठमोळा अंदाज चर्चेत

या पुरस्कार सोहळ्याचा एक प्रोमो सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये सचिन पिळगावकर व सुप्रिया पिळगावकर त्यांच्या डान्सची रिहर्सल करताना दिसत आहेत. १९८४ साली प्रदर्शित झालेल्या ‘नवरी मिळे नवऱ्याला’ या सुपरहिट चित्रपटातील ‘ही नवरी असली’ या गाण्यावर ती दोघं अनेक वर्षांनी एकत्र डान्स करणार आहेत, असं या व्हायरल झालेल्या प्रोमोमधून स्पष्ट होत आहे.

हेही वाचा : “त्या काळी आमच्यात स्पर्धा होती पण…,” सचिन पिळगांवकरांनी उलगडलं महेश कोठारेंबरोबरचं नातं

आता या पोस्टवर कमेंट करत अनेक वर्षांनी या दोघांचा एकत्र डान्स परफॉर्मन्स पाहण्यासाठी उत्सुक असल्याचं नेटकरी सांगत आहेत.