Sagar Karande And Prabhu Shelke fight: ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या सीझनची सध्या चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. या पर्वात एकूण १७ स्पर्धक सहभागी झाले होते. आता राधा पाटील एलिमिनेट झाल्याने सध्या १६ स्पर्धक उरले आहेत.

घरात नुकताच नॉमिनेशन टास्क पार पडला. यामध्ये स्पर्धकांमधील मतभेद पाहायला मिळाले. भांडणे होताना दिसली. विविध टास्कदरम्यान, स्पर्धकांमध्ये चुरस पाहायला मिळते. तसेच, वादा-वादीदेखील दिसते.

आता बिग बॉस मराठीचा नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या प्रोमोमध्ये सागर कारंडे आणि प्रभू शेळके यांच्यात भांडण होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

कलर्स मराठी वाहिनीने, बिग बॉस मराठीचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की प्रभू शेळके आणि रुचिता यांच्यात वाद सुरू आहे. त्यानंतर रुचिता म्युट असे म्हणते. त्याची प्रभू नक्कल करतो.

“प्रभू आवाज जास्त चढवू नकोस”

प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते रूचिता आणि सागर कारंडे शेजारी शेजारी बसले आहेत. प्रभू काहीतरी बोलत असताना सागर कारंडे म्हणतो, “ए प्रभू आवाज जास्त चढवू नकोस”, त्यावर प्रभू त्याला म्हणतो, “काय बोलला?”, त्यानंतर सागर कारंडे जागेवरून उठतो आणि म्हणतो, “कोणी काही बोलत नाही याचा अर्थ असा नाही होत की तू आता काहीही बोलशील”, हा वाद पाहून सगळेच स्पर्धक तिथे एकत्र जमतात. अनेकजण काय झालं आहे, असे विचारत असल्याचे पाहायला मिळते. सगळ्यात शेवटी प्रभू, “मी काही बोललोच नाही”, असे म्हणताना दिसत आहे.

हा प्रोमो शेअर करताना कलर्स मराठी वाहिनीने, “घरातील वातावरण तापणार, डॉन आणि सागरमध्ये राडा होणार”, अशी कॅप्शन दिली आहे.

हा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिले, “मस्त प्रभू, लहान पाहून हे लोक जास्त बोलतात”, दुसऱ्ा एकाने लिहिले, “सागर अति शहाणा आहे”, एकाने लिहिले, “प्रभू सिंपथी कार्ड खेळत आहे.” आणखी एकाने लिहिले, “प्रत्येक आठवड्याला एकेकाचा आवाज वाढतो”, एकाने लिहिले, “सागरला टोळीमध्ये जायचे आहे, म्हणून तो टोळीतील लोकांच्या बाजूने आवाज वाढवतोय”, आणखी एकाने लिहिले, “सागर अति करतोय”, एकाने लिहिले, “प्रभू साधा नाही”, एका नेटकऱ्याने लिहिले, “हा प्रभू ओव्हरअॅक्टिंग खूप करतो”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत. काहींना प्रभूचा खेळ आवडत नसल्याचे पाहायला मिळत आहे. तर काहींना सागरचे वागणे पटत नसल्याचे पाहायला मिळत आहे.

आता हे भांडण नेमकं का झालं, त्याला जबाबदार कोण, कोणाची बाजू बरोबर आणि कोणी चुकीचे हे एपिसोड पाहिल्यानंतर समजणार आहे. तसेच, इतर स्पर्धक हे भांडण मिटवू शकणार का, तसेच कोणते स्पर्धक कोणाची बाजू घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.