Sagar Karande’s Reaction On Vishal Kotian & Raqesh Bapat Fight : सागर कारंडे ‘बिग बॉस मराठी’ सीझन सहामुळे चर्चेत आहे. अलीकडेच अभिनेता ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून बाहेर आहे. शोच्या फिनालेसाठी काहीच दिवस बाकी असताना त्याची शोमधून एक्झिट झाली. घरात असताना सागर नेहमी चर्चेत असायचा. तो त्याची मतं,प्रतिक्रिया ठामपणे मांडायचा.
‘बिग बॉस मराठी’मधून एक्झिट झाल्यानंतर सागरने बाहेर आल्यानंतर दिलेल्या मुलाखतीत ‘बिग बॉस’च्या घरातील त्याचा अनुभव तसेच काही दिवसांपूर्वी ‘बिग बॉस’च्या घरात राकेश बापट व विशाल कोटियन यांच्यामध्ये झालेल्या मोठ्या वादाबद्दल सांगितलं आहे. यावर त्याचं मत काय आहे हेही त्याने सांगितलं आहे. ‘राजश्री मराठी’शी संवाद साधत असताना त्याला अलीकडेच घरामध्ये विशाल आणि राकेशमध्ये खासगी गोष्टी बोलल्यामुळे वाद झाला. जे की शोच्या नियमांमध्येही आहे की खासगी गोष्टींबद्दल बोलू शकत नाही. तू घरामध्ये होतास, तू स्वत: ते पाहिलं आहे त्यामुळे तुझं याबद्दल काय मत आहे असं विचारल्यानंतर त्यानं विशाल खूप आक्रमक आहे असं म्हटलं आहे.
विशाल खूप आक्रमाक आहे – सागर कारेंड
सागर राकेश-विशालमध्ये झालेल्या भांडणाबद्दलचं त्याचं मांडत म्हणाला, “खरं सांगतो विशाल आक्रमक आहे. पण, तो खेळाडूवृत्तीचा माणूस आहे. तो व्यक्त होतो. त्याला मी अनेकदा आक्रमकपणे व्यक्त होताना पाहिलं आहे. पण, हे जे त्याने केलं ते भयंकर चुकीचं होतं. त्यावर स्पष्टीकरण देत तो मला म्हणालेला की त्याने(राकेश) माझं वय का काढलं. मी म्हटलं वय आणि जी गोष्ट तू बोलतोय त्यात खूप तफावत आहे. ही खूप खासगी गोष्ट आहे. जे तू बोललास ती बाहेरची गोष्ट आहे. तो इथे कसा आहे त्याबद्दल बोल, त्याचा स्वभाव पटत नसेल तर बोल. मी त्याला तिथे म्हटलं होतं की हे खूप चुकिचं आहे. त्यानंतर त्याने त्याची चूक मान्य केली होती.”
सागरने पुढे या मुलाखतीत त्याचा ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील प्रवास सांगितला आहे. “फक्त दोन आठवडे राहिले होते… मी शंभर टक्के देत होतो. त्यामुळे वाईट वाटतंय. रडू येईल आता मला. पण, लोकांनी मला खूप पाठिंबा दिला. ठीक आहे आता आपला प्रवास इथपर्यंतच होता. मी तो प्रामाणिकपणे केला. खूप वेगळा अनुभव होता. मी तीन महिने काढले ८५ दिवस राहिलो. माझ्यासाठी हा ऑस्कर आहे.”
