स्टार प्रवाह वाहिनावरील ‘सहकुटुंब सहपरिवार’ ही मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे. या मालिकेतील अनेक कलाकार हे कायमच प्रसिद्धीझोतात असतात. ते प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसतात. या मालिकेत अवनीची भूमिका अभिनेत्री साक्षी महेश उर्फ ​​साक्षी गांधी साकारत आहे. साक्षीने तिच्या अभिनय कौशल्याने मने जिंकली आहेत. पण साक्षीला ही मालिका करण्यापूर्वी खूप संघर्ष करावा लागला होता. तिला ही भूमिका कशी मिळाली? याबद्दल तिने या मुलाखतीत भाष्य केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साक्षीने नुकतंच ‘इ-टाईम्स’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत साक्षीने तिला अवनीची भूमिका कशी मिळाली? याबद्दल सांगितले आहे. यात साक्षी म्हणाली, “मी अवनीच्या भूमिकेसाठी ऑडिशन दिले होते. त्यासाठी फोन येईल असे मला वाटत होते. एक दिवस मला त्यांच्या टीमकडून फोन आला पण त्यात त्यांनी माझी निवड झाली नाही, असे सांगितले. त्यानंतर मी मात्र पूर्णपणे कोलमडली होती. मला नाकारण्यात आल्यानंतर शिकायला मिळाले हे समजून मी पुढे विचार करायला सुरुवात केली होती.”
आणखी वाचा : “तिला कंट्रोल…” दीपाली सय्यद यांनी मानसी नाईक-प्रदीपच्या लग्नाबद्दल केलेला खुलासा

“त्यानंतर काही दिवसांनी मला पुन्हा फोन आला, त्यावेळी त्यांनी माझी अवनी या भूमिकेसाठी निवड करण्यात आल्याचे मला समजले. त्यावेळी मला आश्चर्याचा धक्का बसला. मला सहकुटुंब सहपरिवार मालिकेत सुरुवातीला नकार मिळाल्यानंतर नैराश्य आले होते. मला फार निराश झाल्यासारखे वाटत होते. कारण माझा माझ्या कौशल्यांवर नेहमीच विश्वास होता. सहकुटुंब सहपरिवारच्या शूटिंगसाठी मला माझे मूळ गाव चिपळूण सोडून मुंबईला शिफ्ट व्हावे लागले. माझ्यासाठी तो फार कठीण काळ होता. पण मला ते करावे लागणार होते” असे साक्षी म्हणाली.

आणखी वाचा : ‘सहकुटुंब सहपरिवार’मधील अभिनेत्रीचा मानसिक छळ, निर्मात्यांसह कलाकारांविरोधात केली तक्रार

“मी सुरुवातीच्या काळात नोकरी करायचे. मुंबईसारख्या शहरात एकटीच राहायचे. त्याबरोबरच मी काम सांभाळून अनेक ऑडिशनही देत होते. मी एका मालिकेत छोटीशी भूमिका साकारली होती. त्याबरोबरच एक-दोन छोट्या-मोठ्या भूमिकाही केल्या आहेत. एक वेळ अशी होती की मी माझे भाडेही देऊ शकत नव्हती. पण माझी शब्दांवर मजबूत पकड असल्याने मी व्याख्याने द्यायची आणि पैसे कमवायचे. त्यानंतर मला सहकुटुंब सहपरिवार मालिका मिळाली.

जेव्हा मी सहकुटुंब सहपरिवार मालिका करण्यास सुरुवात केली तेव्हा मी एक सीन करण्यासाठी खूप वेळ घालवायची. मी एका सीनसाठी ३० ते ३५ टेक देत असतं. पण त्यावेळी माझे दिग्दर्शक आणि सहकुटुंब सहपरिवारच्या संपूर्ण टीमने मला खूप मदत केली” असेही तिने सांगितले.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sahakutumb sahaparivar actress sakshee gandhi aka avani talk about struggling days and mumbai life nrp
First published on: 18-11-2022 at 21:00 IST