scorecardresearch

Premium

“आज बिल्डिंगमध्ये फरसाण वाटते…”, सई ताम्हणकरने वाढदिवसानिमित्त प्राजक्ता माळीला दिल्या हटके शुभेच्छा

प्राजक्ता माळीच्या वाढदिवसानिमित्त सई ताम्हणकरने शेअर केली खास पोस्ट; म्हणाली, “लव्ह यू प्राजू…”

sai tamhankar shared special birthday post to wish actress prajakta mali
प्राजक्ता माळीच्या वाढदिवसानिमित्त सई ताम्हणकरने शेअर केली खास पोस्ट

‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेद्वारे अभिनेत्री प्राजक्ता माळी घराघरांत पोहोचली. प्रेक्षकांचे मालिका, चित्रपटांतून मनोरंजन करणाऱ्या प्राजक्ता माळीचा आज ३४ वा वाढदिवस आहे. मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी अभिनेत्रीवर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. सई ताम्हणकरने खास पोस्ट शेअर करत प्राजक्ताला शुभेच्छा दिल्या आहेत. सई आणि प्राजक्ता या दोन्ही अभिनेत्री सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहेत.

हेही वाचा : “शिल्पाला चुकूनही लेखिका म्हणणार नाही”, सुकन्या मोनेंनी केला लाडक्या मैत्रिणीविषयी खुलासा; म्हणाल्या, “तिचा उल्लेख…”

hardeek joshi and akshaya deodhar
“गेल्या ७ वर्षांपासून…”, हार्दिक जोशीच्या वाढदिवसानिमित्त अक्षयाची खास पोस्ट, नेटकरी म्हणाले, “राणादा अन् पाठकबाई…”
hemangi kavi varsha banglow
“वर्षा बंगल्यात शिरताना मनात…”, हेमांगी कवीची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाली “मुख्यमंत्री म्हणून यांच्या हातून…”
priyanka chopra special post for parineeti and raghav
“तुमचं चोप्रा कुटुंबामध्ये स्वागत…”, परिणीती-राघवसाठी प्रियांका चोप्राची खास पोस्ट; म्हणाली…
Madhura deshpande
‘शुभविवाह’ फेम मधुरा देशपांडेने सांगितला नवऱ्याबरोबरच्या पहिल्या डेटचा भन्नाट किस्सा; म्हणाली….

अभिनेत्री सई ताम्हणकरने प्राजक्तासह पारंपरिक लूकमध्ये फोटो शेअर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सई लिहिते, “वाढदिवसाच्या खूप खपू शुभेच्छा प्राजू! आज बिल्डिंगमध्ये फरसाण वाटते तुझ्यावतीने… लव्ह यू प्राजक्ता” असे हटके कॅप्शन देत सईने प्राजक्ता माळीला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. प्राजक्ताने सईची इन्स्टाग्राम स्टोरी रिशेअर करत “धन्यवाद सई…” असे म्हटले आहे.

हेही वाचा : “शूटिंगला जाताना सासरचे नातेवाईक अचानक घरी आले तर…”, प्रश्नाला उत्तर देत प्रिया बापट म्हणाली, “आमच्याकडे येणारे पाहुणे…”

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमात सई आणि प्राजक्ता एकत्र दिसतात. सई या कार्यक्रमात परीक्षकाची जबाबदारी सांभाळते, तर प्राजक्ता माळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करते. प्राजक्ताचा “वा दादा वा…” हा संवाद प्रेक्षकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. त्यामुळे प्राजक्ताच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना अभिनेते समीर चौघुले यांनी “वा दादा वा…” लिहिलेल्या टीशर्टबरोबरचा तिचा फोटो शेअर केला आहे.

हेही वाचा : Subhedar trailer reactions: “साउथवाले ‘केजीएफ’, ‘पुष्पा’ बनवतात आणि मराठी माणूस…”, ‘सुभेदार’चा ट्रेलर पाहून नेटकरी थक्क, म्हणाले…

दरम्यान, सईप्रमाणे अमृता खानविलकर, गौरव मोरे, अमित फाळके, पुष्कर जोग, ऋतुजा बागवे, समीर चौघुले या कलाकारांनी प्राजक्ता माळीला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sai tamhankar shared special birthday post to wish actress prajakta mali sva 00

First published on: 08-08-2023 at 14:47 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×