Sairaj Kendre dance video: बालकलाकार साईराज केंद्रे सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेत काम करत आहे. या मालिकेत त्याने अबीर ही भूमिका साकारली आहे. सारंग व सावलीचा मुलगा, जो आईच्या संस्कारांत वाढला आहे, वडिलांबद्दल त्याच्या मनात उत्सुकता आहे. तो धाडसी, प्रेमळ व प्रसंगावधान दाखवणारा असा आहे. अबीर ही भूमिका प्रेक्षकांची लाडकी आहे.

सावळ्याची जणू सावली या मालिकेआधी साईराज ‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्याच्या सिंबा या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले होते. मात्र, साईराजला त्याआधीच एका गाण्यातून मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली होती. ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ या गाण्यावर त्याने अभिनय केला होता. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.

साईराजचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. काहीवेळा तो त्याच्या आईबरोबर मजेशीर व्हिडीओ बनवतो. काही वेळा मालिकेच्या सेटवरील गमतीजमती पाहायला मिळतात. तर, बऱ्याचदा त्याचे डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात.

साईराज केंद्रेचा आईसह जबरदस्त डान्स

आता साईराजचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये तो पार्वतीच्या बाळा या गाण्यावर डान्स करीत आहे. विशेष म्हणजे त्याची आईदेखील त्याच्याबरोबर डान्स करीत असल्याचे दिसत आहे. दोघांनीही पारंपरिक कपडे परिधान केले आहेत. त्याबरोबरच त्यांच्या डान्स स्टेप्स आणि त्यांची एनर्जीही लक्ष वेधून घेत आहे. दोघेही सुंदर दिसत असून, त्यांचा डान्सही तितकाच सुंदर असल्याचे पाहायला मिळत आहे.

हा व्हिडीओ शेअर करताना, ‘गणपती बाप्पा मोरया’ अशी कॅप्शन देण्यात आली आहे. या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. कमेंट्स करीत चाहत्यांनी दोघांचेही कौतुक केले आहे. नेटकरी नेमकं काय म्हणालेत, याबद्दल जाणून घेऊ…

नेटकऱ्यांनी केले कौतुक

एकाने लिहिले, “सुंदर हावभाव आणि उत्तम एनर्जी”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “खूप खूप छान आणि खूपच सुंदर डान्स केल. बाळा, खरंच तुझं कौतुक करावं तेवढं कमीच आहे.” आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “भारीच”, एकाने लिहिले, “आई व मुलाचा सुंदर डान्स”, एकाने लिहिले, “माय लेकराची जबरदस्त जोडी, भारीच नृत्य सादरीकरण”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “वाह!एकच नंबर”, अशा अनेक कमेंट्स करीत नेटकऱ्यांनी साईराज व त्याच्या आईचे कौतुक केले आहे.

दरम्यान, साईराज मालिका आणि सोशल मीडियाबरोबरच विविध गाण्यांमधूनही प्रेक्षकांच्या भेटीस येत असतो.