Sairaj Kendre : “आमच्या पप्पांनी गणपती आणला” या गाण्यावर अप्रतिम हावभाव केल्यामुळे बालकलाकार साईराज केंद्रे गेल्यावर्षी गणपतीच्या सुमारास रातोरात लोकप्रिय झाला. घराघरांत त्याची चर्चा होऊ लागली. यानंतर हळुहळू साईराज प्रसिद्धीझोतात आला अन् काही महिन्यांपूर्वीच ‘झी मराठी’च्या ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेत साईराजची वर्णी लागली.

‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेत साईराजची एन्ट्री झाल्यावर मालिकेची लोकप्रियता आणखी वाढली. याच लोकप्रिय बालकलाकाराने आता मराठी कलाविश्वातील दिग्गज अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या चित्रपटातील एका एव्हरग्रीन गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. साईराजच्या पालकांनी “छोटा लक्ष्या…” असं कॅप्शन देत त्याचा हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

annapoorna issue srinivasan reaction
“झालं ते विसरून पुढं जायला हवं”, ‘त्या’ व्हिडीओवरील वादावर अन्नपूर्णा हॉटेलचे संचालक श्रीनिवासन यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “ज्यांनी…”
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
Anand Hendre created a world cup scene for Ganeshotsav
असा देखावा पाहिलाच नसेल! १५ फूट ऊंच बॅट, वर्ल्ड कपची ट्रॉफी आणि भल्या मोठ्या चेंडूत गणपती बाप्पा
chhichhore movie has 5 years complete shraddha kapoor share her memories on social media
‘छिछोरे’ सिनेमाला पाच वर्षे पूर्ण! सुशांतबरोबरच्या ‘त्या’ व्हिडीओद्वारे श्रद्धा कपूरचा जुन्या आठवणींना उजाळा, म्हणाली…
Dispute over Emergency movie getting Censor Board certificate in High Court
‘इमर्जन्सी’ला सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र मिळण्याचा वाद उच्च न्यायालयात
Cockroach in Coffee
Cockroach in Coffee : मालाडच्या इनॉर्बिट मॉलमधल्या कॅफेत कोल्ड कॉफीत आढळलं झुरळ, ग्राहकाची थेट पोलिसात धाव
Devendra Bhuyar, Asha sevika, BJP allegation ,
आमदार देवेंद्र भुयार यांची ‘लाडक्या बहिणीं’वर दादागिरी; भाजप नेत्याचा गंभीर आरोप
Anurag dead body, post-mortem, custody,
शवविच्छेदनानंतर अनुरागचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात

हेही वाचा : Bigg Boss Marathi : वर्षा अन् निक्कीच्या वादावर मराठी अभिनेत्याची मोजक्या शब्दांत टिप्पणी, पोस्ट शेअर करत म्हणाला…

लहानग्या साईराजने या व्हिडीओमध्ये ९०च्या दशकातील लूक केल्याचं पाहायला मिळत आहे. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या एव्हरग्रीन ‘झपाटलेला’ चित्रपटातील “धक धक मनात झालया सुरू…” या गाण्यावर साईराज थिरकला आहे. या व्हिडीओमध्ये साईराजच्या गोड हावभावांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर लाइक्स व कमेंट करत हा बालकलाकारावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

साईराज केंद्रेवर ( Sairaj Kendre ) कौतुकाचा वर्षाव

साईराजच्या व्हिडीओला अवघ्या काही तासांतच २ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहे. याशिवाय त्याच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या असंख्य कमेंट्स आल्या आहेत. “हा एकच असा बाल‌कलाकार आहे ज्याने सर्वांची मनं जिंकली आहेत”, “यंदाचा बालकलाकार पुरस्कार तुलाच साईराज”, “किती गोड आहेस रे साई”, “ज्युनिअर लक्ष्या दिसतोय साई” अशा प्रतिक्रिया युजर्सनी या व्हिडीओवर दिल्या आहेत.

sairaj
साईराज केंद्रेच्या व्हिडीओवर आल्या प्रतिक्रिया ( Sairaj Kendre )

हेही वाचा : Kiran Mane : अभिनेते किरण माने आयसीयूमध्ये दाखल, “आयुष्य किती अनप्रेडिक्टेबल असतं..”; पोस्ट चर्चेत

हेही वाचा : Bigg Boss Marathi : वर्षा उसगांवकर अन् निक्कीमध्ये जोरदार भांडण! दोघींनाही अश्रू अनावर, नेमकं काय घडलं?

दरम्यान, साईराज केंद्रेच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर काही महिन्यांपूर्वी त्याने ‘झी मराठी वाहिनी’च्या ‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेत एन्ट्री घेतली. या मालिकेत त्याने अप्पीच्या मुलाची म्हणजेच अमोलची भूमिका साकारली आहे. त्याला प्रेमाने सगळे सिम्बा म्हणून हाक मारत असतात. साईराजचा चाहतावर्ग बालवयातच खूप मोठा आहे.