बिग बॉसच्या १६व्या पर्वाला आज शनिवारी (१ ऑक्टोबर) रोजी सुरुवात होणार आहे. शोचा होस्ट सलमान खान शनिवारी बिग बॉसच्या नव्या परर्वाला सुरुवात करणार आहे. तो एका ग्रँड प्रीमियर एपिसोडमध्ये सेलिब्रिटी स्पर्धकांची ओळख करून देईल. यंदाच्या पर्वात कोणते स्पर्धक असणार, याबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. दरम्यान, यावेळी स्वतः बिग बॉसही या खेळात सहभाग होणार आहे.

Big Boss Home: घर नव्हे तर सर्कस; चार बेडरूम, हटके कन्फेशन रूम ९८ कॅमेरे अन्…! बिग बॉसचं आलिशान घर पाहिलंत का?

याबद्दल बोलताना सलमान म्हणाला, “बिग बॉस खूप प्रामाणिक आणि स्पष्टेवक्ते राहिले आहेत. आता तर ते स्वतः हा खेळ खेळणार आहेत, त्यामुळे ते हा खेळ प्रामाणिकपणे खेळतील, अशी मला खात्री आहे.”दरम्यान, कलर्स टीव्हीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सलमानने रिअॅलिटी या शोबद्दल उत्तर देऊन कंटाळलेल्या एका प्रश्नाचा खुलासाही केला आहे.

“’बिग बॉस’च्या घरात जायला…”, महेश मांजरेकरांनी केलेल्या वक्तव्यावर अमोल मिटकरींची प्रतिक्रिया

हा शो स्क्रिप्टेड आहे की नाही याबद्दल लोकांनी प्रश्न विचारणं आता थांबवायला हवं. “स्क्रिप्टेड आहे किंवा हे लोक त्यांच्या घरी वापस जातात, असं काही नाही. लोकांनी असे प्रश्न विचारणं थांबवल्यास बरं होईल. कारण एकदा तुम्ही बिग बॉसच्या घरात गेल्यावर तुम्हाला बाहेर पडण्याची परवानगी नाही. तुम्ही बिग बॉससारखा शो स्क्रिप्ट करू शकत नाही. जगातला कोणताही लेखक हा शो लिहूच शकत नाही,” असं सलमान म्हणाला.

स्पर्धकांच्या कशा वागण्यामुळे सर्वात जास्त त्रास होतो, याचा खुलासाही सलमानने केला. “प्रत्येकाची स्वतःची रणनीती असते, पण जे शोमध्ये पुढे जाण्यासाठी इतरांना चिडवतात, त्यांचं मी कधीच समर्थन करणार नाही. कोणी असं करत असेल तर त्यांनी प्रामाणिक असलं पाहिजे. तसेच, स्पर्धकांनी एकमेकांशी गैरवर्तन करणे थांबवून स्वतःचा खेळ आणि टास्क याच्यावर जास्त लक्ष द्यायला पाहिजे,” असं सलमानने सांगितलं.