Salman Khan Bigg Boss 20 Contestants Names: टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय व वादग्रस्त रिॲलिटी शो ‘बिग बॉस’ आपल्या २० व्या सीझनसह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. बॉलीवूडचा दबंग खान म्हणजेच सलमान खान यंदाही हा शो होस्ट करणार आहे. या शोमधील स्पर्धकांच्या नावांबाबत दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. त्यामुळे शोचा ग्रँड प्रीमियर कधी होणार, याबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. यंदा बिग बॉसच्या घरात कोणकोणते स्पर्धक प्रवेश करणार आहेत आणि हा शो कधीपासून सुरू होतोय, ते सविस्तर जाणून घेऊया.

कधी आणि कुठे पाहाता येणार ‘बिग बॉस २०’?

‘बिग बॉस २०’ चा ग्रँड प्रीमियर ६ सप्टेंबर २०२६ रोजी होणार आहे. हा रिॲलिटी शो ओटीटी प्लॅटफॉर्म जियो हॉटस्टारवर रात्री ९ वाजता स्ट्रीम केला जाईल. तसेच, कलर्स टीव्ही वाहिनीवर रात्री १०:३० वाजता हा शो प्रेक्षक पाहू शकतील.

‘बिग बॉस २०’ चे स्पर्धक कोण असणार?

सध्या ‘बिग बॉस २०’ मधील स्पर्धकांची यादी हा चाहत्यांमधील सर्वात चर्चेचा विषय बनला आहे. निर्मात्यांनी अद्याप अधिकृतपणे अंतिम यादी जाहीर केलेली नसली, तरी विविध रिपोर्ट्सनुसार काही संभाव्य नावे समोर आली आहेत. यामध्ये माही विज, कुशाल तंवर (गुल्लू), अर्शिफा खान, कनिका मान, ईशा रिखी, काझी तौकीर, नितेश राजपूत, रोहेद खान, ऋती तिवारी, फैसल खान आणि शोविक चक्रवर्ती यांच्या नावांचा समावेश आहे. त्याचबरोबर लव्ह गिल आणि रिया अहीर यांच्यापैकी एकाला जनतेच्या मतांच्या आधारे घरात प्रवेश मिळणार आहे. या दोघांपैकी कोण शोमध्ये येणार, याचा निर्णय ६ सप्टेंबरच्या रात्री ग्रँड प्रीमियर दरम्यानच होईल.

Bigg Boss 20 Salman Khan Release Date
बिग बॉस २० बद्दल माहिती (फोटो- एआय)

बिग बॉस २० ची यंदाची थीम असणार वेगळी

‘बिग बॉस २०’ च्या प्रोमोमध्ये सलमान खानने या सीझनची थीम ‘तथास्तु-टू’ असल्याचं म्हटलंय. तसेच, या वेळी शोमध्ये ‘एक्स्ट्रा जीवनदान’ अशी एक नवीन संकल्पना पाहायला मिळणार आहे. म्हणजेच कठीण परिस्थितीत स्पर्धकांना आणखी एक संधी किंवा लाईफलाईन मिळू शकते. त्याचबरोबर यंदा शोमध्ये दोन घरे असू शकतात अशीही चर्चा आहे, मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.