Salman Khan Bigg Boss Downfall Career Secret: बॉलीवूडचा भाईजान सलमान खानने ‘बिग बॉस’च्या ‘विकेंड का वार’मध्ये त्याच्या करिअरमधील डाऊनफॉलबाबत वक्तव्य केले. ‘बिग बॉस २०’चे सूत्रसंचालन करत असलेल्या भाईजानने त्याचे बॉलीवूडमधील अनुभव आणि एकेकाळी त्याच्याबद्दल निर्माण झालेले नकारात्मक वातावरण याबद्दल वक्तव्य केले. यावेळी त्याने वडील सलीम खान यांनीही समजूत काढल्याचे सांगितले.
सलमान खानने त्याच्या डाऊनफॉल आणि निगेटिव्ह वातावरणाबाबत वक्तव्य केले. स्पर्धकांना त्याचेच उदाहरण देत, एका टीव्ही शोमुळे सलमान खानची प्रतिमा सुधारल्याचे त्याने कबूल केले. सलमान खान म्हणाला, “मी माझ्या स्वतःच्या आयुष्याचं उदाहरण तुम्हाला देतो. मैंने प्यार किया… असे अनेक सिनेमे केले आणि त्यानंतर मी टेलिव्हिजनवर आलो. पण, त्यावेळी माझ्याबाबत खूप नकारात्मकता निर्माण झाली होती. म्हणजे कोर्ट केसपासून, माझ्या रिलेशनशिपपर्यंत आणि माझ्या सिनेमांबाबतही चर्चा होती.”
कोर्ट केस अन् रिलेशनशिपबाबत लिहीत होते – सलमान खान
पुढे सलमान म्हणाला, “एक काळ असा होता की माझ्याबद्दल सगळे काही नकारात्मकच छापले जात होते. कोणतेही वर्तमानपत्र उघडून बघितलं की माझ्या कोर्ट केस, रिलेशनशिप आणि अशा अनेक विषयांवर लिहिलं जात होतं. याबाबत माझी मज्जा घेतली जात होती. तुमच्याबाबत (बिग बॉसचे स्पर्धक) असे काहीही घडत नाहीये. त्यावेळी लोक ‘मैने प्यार किया’, ‘हम साथ साथ हैं’ करणाऱ्या सलमान खानला विसरून गेले होते. त्याच वेळी मला ‘दस का दम’ या शोची ऑफर मिळाली.”

त्यावेळी सलमान खान विरोधात वातावरण निर्माण झाल्याने तो शो करावा का नाही याबाबत त्याच्या मनात शंका असल्याचे त्याने सांगितले. भाईजान म्हणाला, “मी तो शो करणार नव्हतो, कारण माझ्या विरोधात खूप काही बोललं जात होतं. प्रत्येक वर्तमानपत्र आणि टीव्ही चॅनेलवर माझ्यावर सर्व बाजूंनी टीका केली जात होती, त्यामुळे मी माझ्या वडिलांशी याबद्दल बोललो आणि त्यांचा सल्ला घेतला. यावर ते (सलीम खान) म्हणाले, “तुला तुझ्या व्यक्तिमत्त्वावर, मनावर आणि संस्कारांवर विश्वास नाही का?’ मी ‘हो, आहे’ म्हणालो आणि त्यांनी मला शोसाठी होकार देण्यास सांगितले. तसेच मी जसा आहे, तसाच शोमध्ये राहायला सांगितले. त्या एकाच शोमधून सर्वांना कळाले की मी कसा आहे.”
